Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने
Flood Relief: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत न मिळाल्याने संतापाची लाट उसळली आहे. परभणी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी विविध पद्धतींनी सरकारचा निषेध नोंदवला.