Nashik News: नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी. ज्यामध्ये दिंडोरी, नाशिक, कळवण अशा तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अगोदर सप्टेंबरअखेर पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली. त्यातच दिवाळीच्या सणासुदीला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे..दिंडोरी तालुक्यात शनिवारी (ता. १८) सायंकाळी तासभर पावसाने जोरदार तडाखा दिला अनेक ठिकाणी द्राक्ष गोडी बहर छाटण्या सुरू आहेत. मात्र पावसाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी घड निघण्यास अडचणी येत आहेत. या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा आहे..Agricultural Crisis: ही वेळ शेतकऱ्याला उभे करण्याची....एकीकडे मजूर टंचाईचा सामना करत असताना दुसरीकडे मजुरीत मोठी वाढ झाली आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात खरिपाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. टोमॅटो पिकाला सध्या अपेक्षित दर नाही. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे..गेल्या काही वर्षांत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र असे असताना देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी सामोरे जात आहेत.यंदाच्या हंगामात अनेक द्राक्ष बागांमध्ये काडी परिपक्व झाली नाही. त्यामुळे द्राक्ष छाटणीच्या अनुषंगाने शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत. ज्या ठिकाणी द्राक्ष बागांची छाटणी झाली आहे त्यातच आता पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..Farmer Issue: जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच.शनिवारी (ता. १८) गेल्या सकाळी १० वाजता गेल्या २४ तासांत नाशिक तालुक्यातील माडसांगवी व मखमलाबाद, दिंडोरी तालुक्यातील रामशेज व लखमापूर, पेठ तालुक्यातील पेठ व करंजाळी अशा पश्चिम पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. निफाड तालुक्यातील पश्चिम भागात सुकेने व परिसराला सुमारे तासभर जोरदार पावसाने झोपून काढले. या भागात द्राक्षबागांना फटका बसणार आहे. अगोदरच अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे द्राक्ष बागांमध्ये घडांची संख्या कमी आहे. त्यातच झालेल्या पावसामुळे नुकसान वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखव. यासह टोमॅटो उत्पादक शेतकरी फुलकळी खराब होणार असल्याने चिंतेत आहेत..धरणातून पुन्हा विसर्ग सुरूपावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग थांबवण्यात आला होता. दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने दोन दिवसांपासून पुन्हा विसर्ग सुरू आहे. करंजवण (३०१), पालखेड (४३८), पुणेगाव (३५०), तर ओझरखेड (३१०) क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.