Women's Day Agrowon
ॲग्रो विशेष

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त वाशीम येथे कार्यशाळेचे आयोजन

Woman Empowerment : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. ८) जागतिक महिला दिवशी स्थानिक विदाता प्रशिक्षण केंद्रात महिला बचत गटातील सदस्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

Team Agrowon

Washim News : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. ८) जागतिक महिला दिवशी स्थानिक विदाता प्रशिक्षण केंद्रात महिला बचत गटातील सदस्यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे होते.

प्रादेशिक मत्स्य व्यवसाय उपायुक्त विभागाचे सुरेश भारती, जिल्हा क्षेत्रीय अधिकारी गोपाल मुठाळ उपस्थित होते. प्रास्ताविकात केव्हीकेच्या गृह विज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत या वर्षीच्या घोषवाक्याला अनुरूप महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरील उपक्रमांची सांगड कशी घालता यईल याबाबत माहिती दिली.

डॉ. काळे यांनी उद्योग काळाची गरज असून या अनुषंगाने महिलांचा नैसर्गिक शेती उपक्रमात सहभाग वाढीसाठी निविष्ठा उत्पादन व त्याचा शेतीमध्ये वापराचे तंत्रशुद्ध कौशल्य व गट निर्मिती करणार असल्याचे सांगितले. डॉ. एस. के. देशमुख यांनी महिलांसाठी कौशल्यनिपुणता व उद्योजकता या बाबींवर परिणामकारक प्रगतीसाठी कृषी विज्ञान केंद्राची भुमिका मांडली.

सहायक मत्स्य विकास अधिकारी अमिता जैन यांनी शोभिवंत माशांचे समूह स्तरावरील उद्योगाची माहिती देत महिलांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. गोपाल मुठाळ यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली. सुरेश भारती, एम. एन. जयस्वाल व अविनाश जाधव यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT