Rainfall Deficit: अतिवृष्टी, पूरस्थितीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता आली नाही. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावरील शेती खरीप हंगामापासून वंचित आहे. त्यामुळे पालघरच्या शेतकऱ्यांसमोर पावसाअभावी संकट ओढावले आहे..पालघर जिल्ह्यातील तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झालेला नाही. पण जिल्ह्यातील परिस्थिती पारंपरिक दुष्काळापेक्षा वेगळी असली तरी खरीप हंगामातील दोन टप्प्यांत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे उभी पिके, पेरलेले बियाणे, सुपीक माती, शेतीसाठी आवश्यक साधनसामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार.शासनाने दुष्काळी घोषित केलेल्या २६५ तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, रोजगार हमीची कामे वाढविणे, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था यांसारख्या उपाययोजना लागू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीस पूरामुळे झालेले नुकसान तसेच त्यानंतर पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थितीचा स्वतंत्रपणे विचार करूनजिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबरोबर दुष्काळी सवलतींच्या कक्षेत समाविष्ट करण्याची मागणी होत आहे..Kharif Distress : पिकांनी टाकल्या माना; चिंता वाढली.प्रस्तावाची अपेक्षापालघर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने विशेष अहवाल तयार करावा. अतिवृष्टी, पूर, त्यानंतर पावसाअभावी झालेल्या नुकसानीचा फेरआढावा घेऊन विशेष मदत, आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे..पावसाच्या दडीमुळे बळीराजा चिंतितविक्रमगडः जिल्ह्यात हलवा भातपीक कापणीपूर्व अवस्थेत, तर गरवा भात निसवणीच्या टप्प्यात आहे. पण दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली आहे..पालघर जिल्ह्यात खरीपातील भात प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करतात. सिंचनाच्या सुविधा अत्यल्प असल्याने पावसाचा पुरेसा आधार मिळणे पिकासाठी महत्त्वाचे ठरते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने भातपिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिकांना आवश्यक ओलावा मिळणे कठीण झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.