Wheat Sowing
Wheat Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : गहू भिजविण्यासाठी तारेवरची कसरत

Team Agrowon

मी २० नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी ४६ गुंठे क्षेत्रात गहू पेरला (Wheat Sowing). दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसा लाइट होती तसेच कॅनॉलच पाणी (Canal Water) उपलब्ध असल्याने सोमवारीच गहू भिजवता येईल असे गृहीत धरून दुसऱ्या दिवशी कोर्ट असल्यामुळे मी पुण्याला आलो. सोमवारी सकाळी गहू भिजवण्यासाठी सांगितलेल्या संबंधित व्यक्तीस फोन केला असता बाजूलाच असणारे एक शेतकरी त्यांचा ऊस भिजवत असल्याने पाणी आज मिळू शकणार नाही, असे संबंधित व्यक्तीने मला कळवले.

पेरलेल्या गव्हास तीन ते चार दिवस भिजवण्यास उशीर झाला तरीही काही नुकसान होत नाही, याबाबत माहिती असल्याने काळजीच कारण नव्हतं. मंगळवारी गहू भिजवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर टाकली होती त्या व्यक्तीस फोन केला असता त्याने सांगितले इथे काही शेतकऱ्यांमध्ये वाद झाला असल्याने एकाने फ्यूज काढून नेले आहेत. त्यामुळे आज गहू भिजवणे शक्य होणार नाही, त्यामुळे मंगळवारीही गहू भिजवता आला नाही.

दिवसा लाइट सोमवार ते बुधवार असल्याने व त्यातही दोन दिवस गहू भिजवणे शक्य न झाल्याने थोडी चिंता वाटू लागली. ज्या व्यक्तीने फ्यूज काढून नेले होते त्यास फोन करून अडचण सांगितली व बुधवार हा फक्त एकच वार शिल्लक असल्याने त्यास फ्यूज बसवण्यास सांगितले असता त्या व्यक्तीने बसवतो असे म्हणून सकारात्मक प्रतिसाद दिला. गहू भिजवण्याची जबाबदारी टाकलेल्या व्यक्तीस दुसऱ्यादिवशी बुधवारी सकाळी ९.४० ला लाइट येत असल्याने अचूक वेळेत मोटर सुरू करण्यास बजावून सांगितले.

बुधवार उजाडला कोर्ट कामकाजानिमित्त सासवडला मी निघणार होतो. फ्यूज काढून नेलेल्या व्यक्तीस त्याने परत फ्यूज बसवले का? याची खातरजमा केली असता संबंधित व्यक्ती म्हणाली, हो फ्यूज बसवलेत. गहू भिजवण्यास सज्ज असलेल्या व्यक्तीस मोटर सुरू करण्यास सांगितले व मी सासवड कोर्टाच्या दिशेने प्रवास सुरू केला.

थोड्याच वेळात त्या व्यक्तीचा फोन आला. फ्यूज बसवलेत पण त्यातल्या तारा काढून टाकल्यात. गहू पेरून आज चौथा दिवस होता. एका ओळखीच्या व्यक्तीस वायरमन बोलवून फ्यूज दुरुस्त करून घेण्यास सांगितले. फ्यूज दुरुस्त केले. गहू भिजवणाऱ्या व्यक्तीने मोटर सुरू झाल्याचे कळवले. त्यावेळी खळखळ वाजणारा पाण्याचा आवाज कमालीचा आनंद देऊन गेला.

थोड्याच वेळात त्या व्यक्तीचा फोन आला. फ्यूज बसवलेत पण त्यातल्या तारा काढून टाकल्यात. गहू पेरून आज चौथा दिवस होता. एका ओळखीच्या व्यक्तीस वायरमन बोलवून फ्यूज दुरुस्त करून घेण्यास सांगितले. फ्यूज दुरुस्त केले. गहू भिजवणाऱ्या व्यक्तीने मोटर सुरू झाल्याचे कळवले. त्यावेळी खळखळ वाजणारा पाण्याचा आवाज कमालीचा आनंद देऊन गेला.

मोटर सुरू होण्यासाठी दुपारचे १२ वाजले होते. बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत लाइट होती, तोपर्यंत गहू भिजवून होतोय की नाही याबाबत शंकाच होती. परंतु मोटर सुरू झाली त्यामुळे दिवसभरात गहू भिजवून होईल, असा विचार करत मी सासवडला पोहोचलो. कोर्टातील कामकाज सुरू होते अशात गहू भिजवणाऱ्या व्यक्तीचा पुन्हा फोन आला, त्या शेजारच्या व्यक्तीच्या शेतात असलेल्या दाऱ्यातून पाणी येत असल्यामुळे भिजवताना पाणी कमी पडतंय त्याला फोन करून ते दार बंद करायला सांगा.

कोर्टातून त्या शेतकऱ्यास फोन लावला असता ती व्यक्ती मला म्हणाली, आमच्या दाऱ्याची थाळी बाजूच्या दाऱ्याला बसवली आहे. त्यामुळे आमच्या दाऱ्याला थाळी नाही. त्या व्यक्तीस मी म्हणालो, तुमच्या अडचणीमुळे माझा गहू भिजवायचा राहून जाईल तुम्ही यावर काहीतरी मार्ग लगेच काढा. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मग अस करा तुम्हीच वाईवरून नवीन थाळी आणून आमच्या दाऱ्याला बसवा.

अजब सल्ला देणाऱ्या त्या व्यक्तीसोबत पुढील संभाषण टाळले. आमच्या दाऱ्याची थाळी त्या व्यक्तीच्या दाऱ्यास बसवण्यास सांगितली ती त्याप्रमाणे बसवलीही त्यावेळी कुठं जोरात पाणी येऊ लागलं. कोर्टातील काम उरकून ज्यावेळी मी पुण्यात आलो त्यावेळी संध्याकाळचे सहा वाजले होते. गहू भिजवणाऱ्या व्यक्तीस फोन लावून परिस्थितीचा आढावा घेतला असता ती व्यक्ती म्हणाली, अजून बराच गहू भिजवायचा राहिला आहे त्यात साडेपाचला लाइट गेली. दुसऱ्या दिवशी असलेल्या गुरुवारी लाइट असण्याचं टायमिंग होतं, रात्री एक ते सकाळी नऊ वाजेपर्यंत!

गहू भिजवणाऱ्या व्यक्तीस फोन करून रात्री एक वाजता गहू भिजवणार का? असं विचारलं असता ती व्यक्ती म्हणाली, मला उद्या सकाळी काम आहे. त्यामुळे मला शक्य होणार नाही. थोडी फोनाफोनी करून रात्रीचा गहू भिजवण्यासाठी एक व्यक्ती मिळाली. परंतु सोबतीला एक मित्र घेतो या अटीवर ती व्यक्ती तयार झाली. रात्रीची एक वाजता मोटर सुरू करून बऱ्यापैकी गहू भिजवून झाला असेल या विचाराने गुरुवारी सकाळी लवकर जाग आली व संबंधित व्यक्तीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला असता ती व्यक्ती म्हणाली, रात्री जागच आली नाही. त्यामुळे आत्ता आलोय पाच वाजता व मोटर सुरू केली.

मी त्या व्यक्तीस नऊ वाजता फोन करण्यास सांगितले. नऊ वाजताच त्या व्यक्तीचा फोन आला, निम्मा गहू भिजवून झाला आहे निम्मा अजूनही बाकी आहे तेवढं माझं पैसे पाठवून द्या. मित्राच्या फोनपेवर पैसे पाठवले. गुरुवारी दिवसभरात पुण्यात कोर्टात काम सुरू असताना फोनाफोनी करून रात्री एक वाजता गहू भिजवण्यासाठी एक व्यक्ती तयार केली. त्या व्यक्तीने उर्वरित गहू भिजवण्यासाठी रात्री मोटर सुरू केली.

की नाही याबाबत अनभिज्ञता असल्याने त्या व्यक्तीस शुक्रवारी सकाळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला असता ती व्यक्ती म्हणाली, सगळा गहू भिजवून झालाय. अनेक अडचणींवर मात करून हे वाक्य कानावर पडताच समाधान वाटलं खरं, परंतु सामान्य शेतकरी अशा असंख्य अडचणींना कसा सामोरं जात असेल हा प्रश्न मनात निर्माण झाल्यावाचून राहिला नाही. - ॲड. दिग्विजयसिंह ठोंबरे, वाई बावधन जि. सातारा (९७०८३०२३०२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT