नाशिक : ग्रामीण युवकांनी शेळीपालन व्यवसायाकडे (Goat Farming) संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. शेळ्यांच्या विपणनात (Goa Marketing) विशेष अडचणी नसल्याने या व्यवसायाचे वेगळेपण दिसून येते. व्यवसायातील बारकावे शिकून घ्यावेत. शेळ्यांच्या जाती, आहार व रोग व्यवस्थापन, वितांचे व्यवस्थापन आदी गोष्टींकडे काटेकोर लक्ष दिल्यास शेळीपालन व्यवसाय (Goat Farming Business) अतिशय फायदेशीर ठरतो. त्यासाठी शेळीपालनात शास्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे पशुप्रजननशास्र विभागाचे डॉ. संदीप गायकवाड यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत ‘व्यावसायिक शेळीपालन’ या विषयावर ५ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केंद्राच्या प्रक्षेत्रावर करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके, कृषी अभियंता राजाराम पाटील, कृषिविद्या विषय विशेषज्ञ डॉ. प्रकाश कदम उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, की निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनावर मर्यादा येत आहेत. कृषी उत्पादनाच्या बाजारभावाच्या चढउतारामुळे शाश्वत उत्पन्नाची खात्री शेतकऱ्यांना नसते. एकात्मिक शेती पद्धतीद्वारे शेतीव्यवसायातील जोखीम कमी करणे शक्य आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात शेळ्यांचा निवारा व आहार व्यवस्थापन, शेळी प्रसूति व नवजात पिलांचे व्यवस्थापन, विविध आजार व प्रतिबंधात्मक उपाय, शेळ्यांचे विपणन व्यवस्थापन, शेळी पालनासाठी बँक अर्थसहाय्य तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व सिन्नर येथील आदर्श शेळीपालन प्रकल्पाला भेटी, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. प्रशिक्षणासाठी २५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.
उस्मानाबादी बोकडामार्फत शेळी वंशसुधार
डॉ. ठोके म्हणाले, की ग्रामीण भागात शेळ्यांच्या उत्पादकतेत व वजन वाढीच्या बाबतीत कमतरता असतै. शेळीपालनात जवळच्या नात्यात होणाऱ्या प्रजोत्पत्तीमुळे या समस्या निर्माण झाल्या असल्याने केंद्रामार्फत दत्तक गावात शेतकऱ्यांना जातिवंत उस्मानाबादी बोकड पुरवून त्यामार्फत शेळी वंशसुधार केला जात आहे. शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च न करता बोकडांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. शेळीपालनासाठी सुरुवातीचे भांडवल कमीत कमी ठेवून या व्यवसायाची व्याप्ती वाढविणे शक्य आहे. तांत्रिक ज्ञान व कौशल्य देण्यासाठी हे कृषी विज्ञान केंद्र नेहमीच तत्पर आहे, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.