Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार : फडणवीस

Maharashtra Politics Update : आमच्या सरकारने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना सिंचनासाठी दहा हजार कोटी दिले आहेत. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले आहे.

विकास जाधव 

Satara News : महायुती विकासाच्या बाबतीत निधी देण्यात कुठेही मागे पडणार नाही. आमच्या सरकारने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना सिंचनासाठी दहा हजार कोटी दिले आहेत. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले आहे.

तर येणाऱ्या पाच वर्षांची बिले माफ केली जाणार आहेत. पुढील दोन वर्षांनंतर २४ तास ३६५ दिवस कृषिपंपाना वीज मिळणार आहे. शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी पाजण्याचा त्रास यापुढे होणार नाही. शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उत्पन्नावर आकारण्यात येणारा इन्कम टॅक्स यापुढे लागणार नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पाल (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी (ता. ६) कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे,

विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, अशोकराव गायकवाड, शंकरराव शेजवळ, विक्रम कदम, चित्रलेखा माने कदम, संपतराव माने, सचिन नलवडे, भरत पाटील, संपतराव जाधव, महेश जाधव तसेच उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला पाठिंबा दिलेले उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी मनोगते व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Meal Export Subsidy : सोया पेंड निर्यात अनुदानातून सोयाबीनला मिळेल का ‘बूस्ट’?

Sugarcane Crushing Season : राज्य सरकार नमले; गाळप हंगामाला मान्यता

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

SCROLL FOR NEXT