Devendra Fadnavis : काही लोकांना जतचा दुष्काळ घालवणे जमले नाही, पण आता गावागावांमध्ये बागायती शेती होईल : फडणवीस
Pune News : सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघ तसा दुष्काळी. येथे पाण्यावरून सतत राजकारण केले जाते. याच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची प्रचारसभा झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पडळकर यांनी निवडूण द्या, जतचा विकास करून दाखवतो, असे आश्वासन दिले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
फडणवीस यांनी, महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून जतकडे पाहिले जाते. यामुळेच पडळकर यांनी येथून उमेदवारी मागितली. तर येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पडळकरांना या निवडणुकीत विजयी करा. मी जतचा विकास करून दाखवतो. जतला नंबर एकवर नेतो, असे म्हटले आहे. काही लोकांनी जतचा दुष्काळ पुसण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळेच आज येथील लोक दुष्काळात होरपळत आहेत. तालुक्यातील ६४ गावांमध्ये दुष्काळ असतो. यामुळेच मी मुख्यमंत्री होताच बंद असणाऱ्या सिंचन योजना सुरू केल्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
टेंभू उपसा सारखी सिंचन योजना सुरू केली. योजनेस ७ हजार ३७० कोटी रुपये दिले. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली. उपसा सिंचन योजनांना सौर ऊर्जा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. विज बिल भरावे लागणार नाही. याचा पहिला प्रयोग म्हैसाळ योजनेवर केला. यामुळे आता जिल्ह्यातील गावागावांमध्ये बागायती शेती होईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका
यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार निशाना साधला. पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने घेतले, बँका घेतल्या, सुतगिरण्या घेतल्या. पण शरद पवार म्हणतात महाराष्ट्र बदलायचा आहे. महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. मग आता कसला चेहरा पाहिजे? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.