Devendra Fadnavis : राज्यात सरकार भाजपचे नाही तर महायुतीचे येणार, बंडखोरीही निकाली काढू : फडणवीस

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मुंबईत धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवि राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीत आता रंग चढत असतानाच बंडखोरीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (ता.३१) भाष्य केलं आहे. तसेच राज्यात सरकार महायुतीचे येईल, मुख्यमंत्री आमचाच असेल आणि महायुतीतील बंडखोरी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे म्हटले आहे.

फडणवीस यांनी, राज्यात भाजपचे नाही तर महायुतीचं सरकार येणार. तर महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नामांकन भरताना विविध ठिकाणी महायुतीतच क्रॉस फॉर्म भरण्यात आले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी अजित पवार, बावनकुळे, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

Devendra Fadnavis
Maharashtra Assembly Election 2024 : छाननीत ९१७ अर्ज अवैध; लोकसभेच्या तुलनेत राज्यात ५० लाख मतदारांची भर

ज्यात सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असून बंडखोर अर्ज मागे घेतील. यासाठी आमचा प्लॅन तयार आहे. बंडखोरांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. तर महायुतीचे सर्व अर्ज वैध असून दिवाळीनंतर आम्ही जोराने प्रचारास सुरूवात करू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आणखी फटाके फुटने बाकी असून अनेक काँग्रेस नेते ४ तारखेनंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत दिले आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Vidhansabha Election 2024 : सिंधुदुर्ग बागायतदार संघ लढविणार सावंतवाडीतून विधानसभा निवडणूक

ठाकरेंचे राष्ट्रीय अस्मिताचे हिंदुत्व

तसेच राज ठाकरे यांच्याबाबत देखील फडणवीस यांनी भाष्य केले. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली असून त्यांच्या पाठिंब्याबाबत मार्ग काढला जात आहे. राज्य ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका असून त्यांनी, राष्ट्रीय अस्मिता असणारे हिंदुत्व स्वीकारलं आहे. त्यांच्या या भूमिकेला भाजपचे समर्थन असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबईसह कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

दरम्यान काँग्रेसला मुंबईत धक्का बसला असून काँग्रेस नेते रवि राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेसला धक्का बसला असून विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानंतर नाराजीतून जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जयश्री जाधव या दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी असून त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव या कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com