Wheat  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Harvesting : गहू पीक काढणीच्या अवस्थेत

Rabi Wheat Crop : रब्बी हंगामात गहू पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळले.

Team Agrowon

Pune News : रब्बी हंगामात गहू पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळले. सध्या पीक ओंबीच्या व काढणीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी पीक पक्व होत आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागील पंधरा दिवसांपूर्वी राज्यात चांगलीच थंडी असल्याने किमान तापामानात काही प्रमाणात घट झाली होती. त्यातच डिसेंबरमध्ये गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी एक लाख ९३ हजार ४४० म्हणजेच ११५ टक्के पेरणी झाली असून पीक चांगलेच जोमात आले आहे.

यंदा कमी झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता होती. गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र, दिवाळीनंतर अवकाळी पावसामुळे पोषक वातावरण तयार न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली.

सध्या अनेक ठिकाणी गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ हे तालुके गव्हाच्या पिकासाठी ओळखले जात असून विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातही चांगली पेरण्या झाली असून आतापर्यंत सर्वाधिक गव्हाची पेरणी नेवासा तालुक्यात झाली आहे. सुमारे १७ हजार ८९४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल शेवगाव, कर्जत, नगर, पाथर्डी, पारनेर, पाथर्डी, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदा या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे. तर पारनेर, संगमनेर, जामखेड, अकोले या तालुक्यांत काहीशा कमी पेरण्या झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे सहा हजार ४३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, शिरूर, बारामती, इंदापूर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहे. तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, पुरंदर तालुक्यांत कमी पेरण्या झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सुमारे ८ हजार ८१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांतही चांगलीच पेरणी झाली आहे. तर करमाळा, बार्शी तालुक्यात कमी पेरणी झाली आहे.

पुणे विभागात झालेली गव्हाची पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्केवारी

नगर --- ८६,४०५ -- १,१९,०२० --- १३८

पुणे --- ३९,८०३ --- ३६,४००-- ९१

सोलापूर --- ४२५८८ --- ३८,०२० -- ८९

एकूण -- १,६८,७९६ -- १,९३,४४० -- ११५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT