Wheat Sowing : गव्हाचे क्षेत्र ९४ हजार हेक्टरने घटले

Wheat Production : यंदा अपुरा पाऊस असल्याचा गव्हाच्या पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीपेक्षा ९४ हजार हेक्टरने गव्हाची पेरणी कमी झाली आहे.
Wheat Sowing
Wheat Sowing Agrowon

Nagar News : यंदा अपुरा पाऊस असल्याचा गव्हाच्या पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीपेक्षा ९४ हजार हेक्टरने गव्हाची पेरणी कमी झाली आहे. राज्यातील वीस जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली आहे. राज्यात सर्वाधिक पेरणी नगर जिल्ह्यात झाली आहे. मात्र नगर जिल्ह्यातही गतवर्षीपेक्षा गव्हाची पेरणी कमीच आहे.

राज्यात रब्बीचे ५३ लाख ९६ हजार ९६० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीचे, त्यापाठोपाठ हरभरा आणि गव्हाचे क्षेत्र असते. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे पाण्याची उपलब्धताही फारशी नाही. त्याचा काहीसा परिणाम गहू पेरणीवर झाल्याचे दिसून येत आहे.

यंदा गव्हाची पेरणी सरासरीच्या ९९ टक्के झाली असून गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर आहे. आतापर्यंत राज्यात १० लाख ३९ हजार ३६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी ११ लाख ३३ हजार ४५३ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सर्वाधिक नगर, नागपूर जिल्ह्यांत गव्हाची पेरणी झाली आहे.

Wheat Sowing
Wheat Sowing : पाणीटंचाईमुळे गहू पेरणीत ३१ टक्क्यांनी घट

चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, नांदेड, नगर या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक गव्हाची पेरणी झाली आहे. कोकणात गव्हाचे क्षेत्र नाही, तर गडचिरोलीत सर्वांत कमी गव्हाचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी ११ लाख ३३ हजार ४५३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९४ हजार ०८७ हेक्टरने गव्हाचे क्षेत्र कमी झाले आहे.

ज्वारी वाढली तीन लाख हेक्टरने

राज्यात रब्बी ज्वारीचे १७ लाख ५३ हजार ११० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने घटले आहे. ज्वारी हे कोरडवाहू पीक आहे. यंदा मात्र अपुऱ्या पावसामुळे अनेक भागात अन्य पिकांपेक्षा ज्वारीला प्राधान्य दिले.

Wheat Sowing
Wheat Sowing : गव्हाचा पेरणी क्षेत्रात घट

त्याचा परिणाम म्हणून सातत्याने घट होत असलेल्या ज्वारीच्या क्षेत्रात मात्र २ लाख ९२ हजार हेक्टरने ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे यंदा बाजारात ज्वारीसह कडब्याची काही प्रमाणात उपलब्धता होईल, असे दिसतेय. यंदा १६ लाख १७ हजार ८०३ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षी १२ लाख ९७ हजार ९१२ हेक्टर ज्वारीचे क्षेत्र होते.

जिल्हानिहाय गव्हाची पेरणी (हेक्टर)

नाशिक ः ४२१८०, धुळे ः ३८८०४, नंदुरबार ः २१११७, जळगाव ः ४३१०४, नगर ः ११९०२०, पुणे ः ३६,४००, सोलापूर ः ३८,०२०, सातारा ः ३२,९६१, सांगली ः १३८०७, कोल्हापूर ः १२१९, छत्रपती संभाजीनगर ः ६८,७८५, जालना ः ४०,९१९, बीड ः ३५,४९६, लातुर ः १०,५७९, धाराशिव ः १८,१०२, नांदेड ः ३९५३, हिंगोली ः ३६०४६, बुलडाणा ः ५७०६०, अकोला ः २८,०४१, वाशीम ः ३६,४०२१, अमरावती ः ४३८०९, यवतमाळ ः ६००५२, वर्धा ः २९,४५०, नागपूर ः ९१,०५९, भंडारा ः १०,८८६, गोंदिया ः १६०१, चंद्रपूर ः १७,१८४, गडचिरोली ः ६९५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com