sandeep Shirguppe
भारत हा शेती समृद्ध देश म्हणून ओळखला जातो, देशात बऱ्यापैकी अन्नधान्य निर्मीती होत असल्याने कृषीप्रधान देश म्हणून आपली जगात ओळख आहे.
भारतात तांदुळ, कांदा, कापूसाबरोबर सर्वाधिक उत्पादन गव्हाचे घेतले जाते. सध्या भारत गव्हाच्या उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे.
जगातील अनेक देशांमध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी सर्वात जास्त धानाचे उत्पादन करणारा देश रशिया आहे.
अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सर्वाधिक धान उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतातील सर्वाधिक गव्हाचे उत्पादन करणाऱ्या राज्याबाबत बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेशचे नाव अग्रक्रमावर येते.
भारताच्या एकूण गव्हाच्या उत्पादनापैकी ३२.४२ टक्के उत्पादन उत्तर प्रदेशात होते.
उत्तर प्रदेशातील हवामान आणि मातीमुळे याभागात सर्वाधिक उत्पादन होते. यामध्ये गंगा, जमुना नद्यांमुळे हा भाग समृद्धा आहे.
भारतात पीक वर्ष २०२२-२३ (जुलै ते जून) मध्ये गव्हाचे उत्पादन सुमारे ११ कोटी टन होते.
मध्य प्रदेश हे भारतातील दुसरे सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य आहे. येथील गव्हाचे उत्पन्न १६ टक्के आहे.