Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाच्या गॅरेंटीचे काय?

Sharad Pawar on PM Modi : फक्त आश्‍वासने देणे याशिवाय दुसरे काहीच करायचे नाही,’’ अशी खरमरीत टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

Team Agrowon

Nashik News : ‘‘सगळे सांगत आहेत मोदी यांची गॅरेंटी. काय गॅरेंटी दिली हे सांगावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत गॅरेंटी दिली होती. कुणाचेही उत्पन्न वाढले नाही. त्याचे काय झाले. आत्महत्या थांबल्या नाहीत. उलट वाढल्यात. रोजगार वाढवणार, बेकारी घालवणार याची गॅरेंटी दिली.

त्यातली एकही गॅरेंटी पूर्ण झाली नाही. फक्त आश्‍वासने देणे याशिवाय दुसरे काहीच करायचे नाही,’’ अशी खरमरीत टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. निफाड (जि. नाशिक) येथे बुधवारी (ता. १३) महाएकजूट सभेचे आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले. खासदार संजय राऊत, डॉ. अमोल कोल्हे, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,

आमदार जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, नरेंद्र दराडे, सुनील भुसारा यांच्यासह विविध पक्ष, संघटनांतील नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सभेप्रसंगी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. आदिवासी भागातून अखिल भारतीय किसान सभेचे अनेक कार्यकर्ते लालबावट्यासह उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात असताना शेतकऱ्यांचे ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केले. शेतीमालाच्या किमती वाढवल्या. नवीन बी-बियाणे दिले. जगातल्या १८ देशांना धान्य पुरवायचे काम देशातला शेतकरी करत आहे. पण आजचे राज्यकर्ते या धोरणाचा विचार करत नाहीत.’’

‘‘भाजप सरकार गरिबांच्या विरोधात निर्णय घेणारे आणि श्रीमंतांची काळजी घेणारे आहे,’’ असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

शेतकरी बचाव ही आमची गॅरेंटी

शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा कोणी आले नाही. आताही शेतीमालाला भाव नाही. शेतकरी अडचणीत आहे. गॅरेंटी कसली देता? भाजपचे राज्य येणार नाही याची आम्ही गॅरेंटी देतो. ‘भाजप हटाव शेतकरी बचाव’ ही गॅरेंटी घेऊन आम्ही आलो आहोत’’, असे राऊत यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT