Sugarcane Crushing : मराठवाड्यात २ कोटी ३९ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या ऊस हंगाम गाळपात जवळपास ६१ कारखान्यांनी सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी आत्तापर्यंत २ कोटी ३९ लाख ६५ हजार ७२० टन उसाचे गाळप करत तब्बल दोन कोटी २६ लाख ९६ हजार २७८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या ऊस हंगाम गाळपात जवळपास ६१ कारखान्यांनी सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी आत्तापर्यंत २ कोटी ३९ लाख ६५ हजार ७२० टन उसाचे गाळप करत तब्बल दोन कोटी २६ लाख ९६ हजार २७८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. १३ मार्चपर्यंत मराठवाड्यातील ११ कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपला होता.

सुरवातीला पावसाने दडी मारल्याने यंदाचा ऊस गाळप हंगाम कसा राहील याची चिंता होती. परंतु मध्यंतरी आलेल्या अवेळी पावसामुळे उसासह सर्वच पिकांचं आजचं मरण उद्यावर ढकलला गेले. सोबतच उसाच्या क्षेत्रात सिंचनासाठी काही प्रमाणात का होईना पाणी सोडल्या गेले. त्याचा सर्वाधिक फायदा ऊस शेतीला होताना दिसतो आहे.

Sugar Factory
Sugarcane Crushing : राज्यात अजून ५० लाख टन उसाचे गाळप बाकी

शिवाय जालना जिल्ह्यातील काही कारखान्यांच्या परिसरात नियोजित गाळप होऊनही ऊस अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या उसगाळपात तब्बल ६१ कारखान्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये २७ सहकारी तर ३४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी १३ मार्चपर्यंत तब्बल २ कोटी ३९ लाख ६५ हजार ७२० टन उसाचे गाळप केले.

या ऊस गाळपातून २ कोटी २६ लाख ९६ हजार २७८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे साखरेचे उत्पादन करताना लातूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.४९ टक्के राहिला तर सर्वात कमी साखर उतारा हा बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी ८.११ टक्के इतका राहिला.

Sugar Factory
Sugarcane Season : ऊसतोड मुकादमास २० लाखांचा दंड

लातूर पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८७ टक्के, परभणी जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८१ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.५९ टक्के, जालना जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.३३ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.११ टक्के तर नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९ टक्के इतका राहिला आहे.

गाळप हंगाम आटोपलेले कारखाने...

ऊस गाळप हंगाम थांबलेल्या कारखान्यांमध्ये धाराशिवमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि., अरविंदनगर व कंचेश्वर शुगर लि., मंगळूर, छत्रपती संभाजीनगरमधील खडकपूर्णा ॲग्रो लि, जालन्यातील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सिपोरा, बीडमधील जय भवानी सहकारी साखर कारखाना लि., गेवराई व डीव्हीपी कमोडिटी एक्स्पर्ट प्रायव्हेट लि., परभणीतील श्री रेणुका शुगर लि., देवनंद्रा, नांदेडमधील एम व्ही. के. ॲग्रो फूड्स प्रॉडक्ट लि., वाघळवाडा व ट्वेंटीवन शुगर लि., शिवनी तसेच लातूरमधील शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., किल्लारी यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय ऊस गाळप(टन) व साखर उत्पादन (क्विंटल)

जिल्हा ऊस गाळप साखर उत्पादन

छ.संभाजीनगर १७ लाख ९८ हजार ७४२ १७ लाख २४ हजार २४५

जालना २४ लाख १० हजार ८०६ २२ लाख ५० हजार १६३

बीड ३८ लाख १७ हजार ९९९ ३० लाख ९५ हजार ८५५

परभणी ३२ लाख ६९ हजार १२२ ३२ लाख ०६ हजार ७००

हिंगोली १४ लाख ५० हजार १९१ १४ लाख ३१ हजार २५०

नांदेड १८ लाख ६७ हजार ५६१ १८ लाख ४८ हजार २७५

लातूर ४५ लाख ०८ हजार २७२ ४७ लाख २९ हजार ६०५

धाराशिव ४८ लाख ४३ हजार ०२७ ४४ लाख १० हजार १८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com