PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Modi Statement: आमच्या अटींवर, आमच्या पद्धतीने उत्तर देऊ: मोदी

PM Narendra Modi Warning to Pakistan: ‘‘भारत दहशतवादी कारवायांना यापुढे थेट आणि चोख प्रत्युत्तर देणार आहे. आम्ही आमच्या अटींवर या कारवाया करू. अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला.

Team Agrowon

New Delhi News: ‘‘भारत दहशतवादी कारवायांना यापुढे थेट आणि चोख प्रत्युत्तर देणार आहे. आम्ही आमच्या अटींवर या कारवाया करू. अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १३) आदमपूर हवाई तळाला खास भेट देऊन तेथील जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी भारतीय सेनेला संबोधित केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताची तसेच भारतीय सेनेच्या आगामी भूमिकेबाबतही थेट भाष्य केले.

ते म्हणाले, की भारताने आता तीन सूत्रे समोर ठेवली आहेत. यापुढे भारतावर हल्ला झाला तर भारत आपल्या शर्तींवर, आपल्या पद्धतीने आणि आपल्या वेळेनुसार उत्तर देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही अणुबॉम्बच्या धमक्यांना भीक घालणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे दहशतवादाचे आका आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार याला वेगवेगळे पाहणार नाही.

‘‘जगदेखील भारताच्या या नव्या रूपाला समजून घेत पुढे जात आहे. ऑपरेशन सिंदूरचा एक-एक क्षण भारतीय सेनेच्या सामर्थ्याची साक्ष देत आहे. या काळात भारतीय सेनेची सुसूत्रता फारच चांगली होती.

नौदलाने समुद्रावर आपली ताकद दाखवून दिली. भूदलाने सीमेवर लक्ष ठेवले तर भारतीय वायुसेनेने हल्लाही केला आणि संरक्षणही केले. बीएसएफ तसेच अन्य दलांना अद्‌भुत क्षमता दाखवले,’’ असा शब्दांत जवानांचे कौतुक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT