Narendra Modi Statement: ‘न भूतो न भविष्यती’ अशी अद्दल दहशतवाद्यांना घडवू

Modi Warns Terrorists: पहलगामच्या हल्ल्यात सामील असलेल्या दोषींना पाताळापर्यंत पाठलाग करू आणि त्यांचा शोध घेत शिक्षा करू. त्यांना थारा देणाऱ्यांचा माग काढत ‘न भूतो न भविष्यती’ अशी अद्दल घडवू.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Bihar News: पहलगामच्या हल्ल्यात सामील असलेल्या दोषींना पाताळापर्यंत पाठलाग करू आणि त्यांचा शोध घेत शिक्षा करू. त्यांना थारा देणाऱ्यांचा माग काढत ‘न भूतो न भविष्यती’ अशी अद्दल घडवू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दिला.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘या अमानवी कृत्यात सामील असणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा दिली जाईल आणि अशा हल्ल्यामुळे भारत कधीही डगमगणार नाही. पहलगाममधील दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढू आणि शिक्षा करू. पाताळात लपले असले तरी त्यांचा पाठलाग करू.

PM Narendra Modi
PM Modi : बनास डेअरीला पंतप्रधान मोदींकडून १०६ कोटी रुपयांचं बोनस

पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. मानवतेवर विश्‍वास ठेवणारे लोक आमच्यासमवेत आहेत. आमचा निर्धार पक्का आहे. अनेक देशांच्या नागरिकांनी आणि नेत्यांनी आमच्या या दुःखदप्रसंगी धीर दिला आणि ते खंबीरपणे आमच्यासमवेत राहिले आहेत. त्यांच्याविषयी आपण ऋण व्यक्त करतो. या हल्ल्याचे कारस्थान रचणारे आणि हल्ला करणाऱ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे शिक्षा दिली जाईल आणि शिक्षा नक्कीच मिळेल.’’

पंतप्रधान म्हणाले, की १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा कणा मोडून टाकेल. २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. देशभरातील प्रत्येक नागरिक या घटनेने शोकाकूल आहे. संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.’’

PM Narendra Modi
PM Narendra Modi: मोदींचे विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हवाई हद्दीत!

भाषण सुरू होण्यापूर्वी पीडितांना श्रद्धांजली म्हणून मोदी, व्यासपीठावरील अन्य नेते आणि उपस्थित जनतेने मौन पाळले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘या घटनेत अनेकांनी आपले मुलगे, भाऊ आणि पती गमावले. बळी गेलेले नागरिक पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि बिहार अशा विविध राज्यांतील होते. सर्वांचे दुःख आणि संताप हा कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सारखाच आहे. वेगवान विकासासाठी शांतता आणि सुरक्षितता आवश्यक आहे.’’

संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहलगाममधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण देश एकवटला आहे, असे नितीशकुमार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीशकुमार यांनी त्यांच्या राजकीय भूमिकाही स्पष्ट केल्या.

ते म्हणाले, मी पूर्वी चूक केली होती, पण आता मी कायमच एनडीएसमवेत राहणार आहे. हल्ल्यामुळे देश हादरून गेला आहे. हे एक क्रूर आणि अमानुष कृत्य होते. आपण सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. मी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. संपूर्ण देश या लढ्यात एकत्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com