Operation Sindoor
Operation SindoorAgrowon

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर सुरूच

India Pakistan Conflict : गत शनिवारी पाकसोबत शस्त्रसंधी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे, हे विशेष.
Published on

New Delhi News : ‘‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असून येत्या काळात याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल,’’ असे तत्काळ विशेष अधिवेशन बोलावा रविवारी सांगण्यात आले. गत शनिवारी पाकसोबत शस्त्रसंधी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे, हे विशेष. दरम्यान उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची सोमवारी (ता. १२) बैठक होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत देण्यात आलेली सर्व उद्दिष्टे हवाई दलाने यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. हे अभियान विचारपूर्वक आणि अतिशय सावधानता बाळगत पार पाडण्यात आले. अभियान अद्याप सुरू असल्यामुळे त्याची विस्तृत माहिती देणे उचित ठरणार नाही.

Operation Sindoor
India Pakistan Conflict: भारत-पाकिस्तानातील संघर्ष अखेर थांबला

येत्या काळात ही माहिती दिली जाईल. लोकांनी अफवांपासून वाचावे आणि माहितीची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय ती दुसरीकडे पसरवू नये, असे हवाई दलाकडून समाज माध्यमांद्वारे सांगण्यात आले आहे.

Operation Sindoor
India-Pakistan Border Tension: भारत-पाकिस्तान सीमेवर आतापर्यंत १८ मृत्युमुखी

आज बैठक

दरम्यान उभय देशांच्या मिलिटरी ऑपरेशन विभागांच्या (डीजीएमओ) अधिकाऱ्यांची सोमवारी दुपारी बारा वाजता बैठक होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकचे डीजीएमओ काशिफ अब्दुल्लह यांनी भारताचे डीजीएमओ राजीव घई यांना शनिवारी दुपारी थेट दूरध्वनी करत शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता.

भारताकडून हा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. लष्करी कारवाया पार पाडण्याची जबाबदारी डीजीएमओकडे असते. लष्कराच्या तिन्ही विभागांमध्ये समन्वय साधणे, युद्ध सुरू झाल्यापासून ते त्याचा शेवट होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या ‘डीजीएमओ’कडून पार पाडल्या जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com