Water Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Indapur Farmers Protest: आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कालव्याला पाणी

Rural Water Injustice: इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्यासाठी रास्तारोको आंदोलनाची तयारी केल्यानंतर पाटबंधारे विभाग हलला आणि तातडीने खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले.

Team Agrowon

Pune News: खडकवासला कालव्याच्या आवर्तनासाठी सोमवारी इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्र. २ येथे करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आल्यामुळे स्थगित करण्यात आले. शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू करण्याची तत्परता दाखविली आहे.

रविवारी (ता. ४) सकाळी कालव्याच्या पाण्याने तालुक्याची शीव ओलांडली आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी बारा दिवसांचे हे आवर्तन असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सिंचनाला मज्जाव केला जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

१८ फेब्रुवारीला खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले होते. या पाण्याला तालुक्याची शीव गाठण्यासाठी १ मार्च उजाडला. वीस दिवस सुरू राहिलेल्या या पाण्याचा प्रवाह कमी असल्याने, पाणी टेलला पोचले नाही. शिवाय यातून कालव्यावरील वितरिकांतूनही पुरेसे पाणी सोडण्यात आले नव्हते. यानंतर सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आला तरी तालुक्याला कालव्याचे पाणी दिले जात नव्हते.

अखेर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बैठक घेत कालव्याच्या पाण्यासाठी आज रास्तारोको आंदोलन करण्याची तयारी केली होती. या बाबतचे निवेदन खडकवासला पाटबंधारे विभाग, तहसीलदार व पोलिसांना देण्यात आले होते. निवेदनाच्या प्रति पोचताच वेगाने सूत्रे फिरली. पाटबंधारे विभागाने तत्परता दाखवून तातडीने कालव्याचे आवर्तन सुरू केले आहे. परिणामी शेतकऱ्यांना रास्तारोको आंदोलन स्थगित करावे लागले.

दरम्यान खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज हुलसुरे म्हणाले, की कालव्याच्या पाण्याने तालुक्यात प्रवेश केला आहे. सुमारे ३३० क्युसेक वेगाने पाणी आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. सुमारे १२ दिवस कालव्याचे आवर्तन सुरु राहण्याची शक्यता आहे.

शेतीचे पाणी कुठे मुरले?

पाटबंधारे विभागाने इंदापूरकरांच्या वाटणीचे एक आवर्तन अलगत कपात केले आहे. १८ फेब्रुवारीला कालवा सुरू केल्यानंतर २० एप्रिलला कालवा बंद होणार होता. १ मे ला पुन्हा कालवा सुरू करण्याचा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाला होता. मात्र अद्यापपर्यंत बंद केलेला नाही.

मग सुमारे दहा दिवस अतिरिक्त सुरू राहिलेल्या कालव्याचे पाणी नेमके मुरले कुठे? याची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होण्याची गरज आहे. संबंधित पाणी अधिकाऱ्यांनी विकल्याची दबक्या आवाजात चर्चा एेकायला मिळत आहे. इंदापूरकरांच्या वाटणीच्या पाण्यावरही डल्ला मारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT