Water Management : जल व्यवस्थापनात कुकडी पाटबंधारे अव्वल

Kukadi Irrigation Division : शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ मोहीम राज्यात जिल्हानिहाय राबविण्यात आली होती.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Pune News : शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ मोहीम राज्यात जिल्हानिहाय राबविण्यात आली होती. आयोजित जिल्हा व्यवस्थापन मोहिमेत कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ नारायणगाव विभागाचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली.

जल व्यवस्थापन मोहिमेचा प्रारंभ कार्यक्षेत्रातील पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. माजी गृह व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद आणि मंगळवारी (ता. २९) पाणी वापर संस्थांची कार्यशाळा नुकतीच नारायणगाव येथे पार पडली.

Water Crisis
Water Management: डोंगरी भागाच्या जलव्यवस्थापनाचा आराखडा तत्‍काळ तयार करा

संपूर्ण पंधरवड्यात जलसंपदा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद, भूसंपादन व पुनर्वसन यातील अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, कालवा स्वच्छता अभियान, उपसा सिंचनाचे पाणी परवाने देण्यास तक्रारीचे निरसन करणे, जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन बाबत कार्यशाळा, सिंचनाची

Water Crisis
Water Management : जलसंपदा विभागाने व्यवस्थापनावरही भर द्यावा

पाणीपट्टी आकारणी व वसुली आढावा, कृषी विज्ञान केंद्र व सेवाभावी संस्थांच्या सोबत संवाद व कृती कार्यक्रम, पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असलेल्या प्रकरणांचा शोध घेणे, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र कार्यशाळा, २०२४-२५ मधील सिंचनाच्या कामात उत्तम कामगिरी व कामास गती येण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन प्रोत्साहित केले.

प्रशांत कडूसकर यांना पुरस्कार :

पुणे जिल्ह्यात जल व्यवस्थापन मोहीम कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमुख प्रशांत कडूसकर यांनी योग्य नियोजन व कार्यकुशलतेने राबविल्याने नारायणगाव कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक-१ यांना जलसंपदा विभागात पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे स्थान तर प्रशांत कडूसकर यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com