Water Scarcity : जालना जिल्ह्यात टँकरची ‘सेंच्युरी’

Tanker Water Supply : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केल्यानुसार टॅंकरची मागणी वाढण्यास सुरवात झाली आहे.
Water Tanker
Water Tanker Agrowon
Published on
Updated on

Jalna News : जिल्ह्यात टॅंकरच्या संख्येची सेंच्युरी पूर्ण झाली आहे. ६० गावांसह १६ वाड्यांसाठी तब्बल १०१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये सर्वाधिक ३९ टॅंकर बदनापूर तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या अधिक झळा जाणवण्यास सुरवात झाली आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केल्यानुसार टॅंकरची मागणी वाढण्यास सुरवात झाली आहे. आठपैकी पाच तालुक्यांतील ६० गावांसह १६ वाड्यांवरील एक लाख ८७ हजार ५०२ ग्रामस्थांना १०१ टॅंक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय १३० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काळात टॅंकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Water Tanker
Marathwada Water Crisis: मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याच्या वल्गना कागदावरच

जालना तालुक्यात २१ टॅंकर

तालुक्यातील सहा गावे आणि आठ वाड्यांवरील ३२ हजार २१६ ग्रामस्थांसाठी २१ टॅंकर सुरू आहेत. शिवाय २३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

बदनापूर तालुक्यात २३ गावे तहानलेली

तालुक्यातील २३ गावांसह आठ वाड्यांवरील ८२ हजार १५९ ग्रामस्थांसाठी ३९ टॅंकर सुरू केले आहेत; तसेच ३९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Water Tanker
Water Crisis : पाण्याची बचत अन् काटकसर ही काळाची गरज

जाफराबाद तालुक्यात पाच गावांत टचाई

तालुक्यातील पाच गावांतील १२ हजार ३५८ ग्रामस्थांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. २२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

भोकरदन तालुक्यात १२ टॅंकर

तालुक्यातील तीन गावांतील सहा हजार १७ ग्रामस्थांसाठी पाच टॅंकर सुरू आहेत. १५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

अंबडमध्ये २८ टॅंकर, २९ विहिरींचे अधिग्रहण

तालुक्यातील २३ गावांतील ५४ हजार ७५० ग्रामस्थांसाठी २८ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. तसेच, २९ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com