Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सातारा जिल्ह्यात १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Crisis : सध्या जिल्ह्यात दोन लाख ९४ हजार ४४५ लोकांना १७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात पाणीटंचाई भीषण होऊ लागल्याने प्रशासनास टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात दोन लाख ९४ हजार ४४५ लोकांना १७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात उष्णता वाढल्याने पिण्याच्या पाण्याची अवस्था वाईट होत आहे. जिल्ह्यात तब्बल आठ तालुक्यांत १७८ गावे व ६०३ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ४९ हजार ४४५ लोकांना १७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात टंचाईच्या झळा सर्वाधिक माण तालुक्यात बसत आहेत. एकट्या माण तालुक्यात ८३ टँकरद्वारे ६५ गावे व ४०१ वाड्यावस्त्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक विहिरी, बोअरवेल आटल्या असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांचेही नुकसान होणार आहे.

माण पाठोपाठ खटाव तालुक्यात टंचाईच्या झळा बसत आहे. खटाव तालुक्यात ३४ टँकरद्वारे ४४ गावे व १०७ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात २४ टँकरद्वारे ३४ व ८८ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यात २३ टँकरद्वारे २६ गावांत पाणीपुरवठा केला जात आहे.

पाटण तालुक्यात चार टँकरद्वारे एक गाव व चार वाड्यावस्त्यांवर, वाई तालुक्यात चार टँकरद्वारे तीन गाव व तीन वाड्यावस्त्यांवर, खंडाळा तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावात, कऱ्हाड तालुक्यात दोन गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. राज्यात परतीचा पाऊसही झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत निर्माण होणारी परिस्थिती जानेवारीमध्ये दिसून येत आहे. या स्थितीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होऊ लागले आहे.

विहीर, बोअरवेलचे अधिग्रहण

जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ होत असल्याने विहीर व बोअरवेलचे अधिग्रहणात वाढ केली जात आहे. संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५० विहिरीचे व ४२ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT