Water Scarcity : ग्रामीण महाराष्ट्रावर पाणीबाणीचे संकट

Water Issue : राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना तब्बल १८३७ हून अधिक गावे आणि ४३१८ वाड्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे.
Water Issue
Water IssueAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना तब्बल १८३७ हून अधिक गावे आणि ४३१८ वाड्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. ग्रामस्थांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत याकडे राजकीय पक्षांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

Water Issue
Water Scarcity : ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढली; उपाययोजना संथगतीने

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत तब्बल २८ पटींनी वाढ झाली असली, तरी पाण्याचे नियोजन करण्यास सरकारला वेळ नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात जनावरांच्या चारा आणि पाण्याचे गंभीर संकट उभे राहिल्याने जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात आहेत. मात्र याच कारणामुळे अनेक ठिकाणी दुभत्या जनावरांसह शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या बैलांचे दरही झपाट्याने उतरले आहेत.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच संपूर्ण राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा ३३.३८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी १२ एप्रिल रोजी राज्यात केवळ ७० गावे आणि २०४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासाठी केवळ ७५ टँकर होते.

Water Issue
Dam Water Stock : भामा आसखेड धरणामध्ये अवघा २८.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक

राज्य सरकारने ४० तालुके आणि ११०० हून अधिक मंडलांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे येथे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक होते. मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आहे.

छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक ५२७ टँकर

राज्यात सर्वत्र टंचाई निर्माण झाली असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ठाणे जिल्ह्यात ३५ , रायगडमध्ये १९, पालघरला ३३, रत्नागिरीत ३, नाशिकला २५५, जळगावला ७८, नगरला १८१, पुण्यात १३८, साताऱ्यात १६२, सांगलीत ९३, सोलापुरात ६८, छत्रपती संभाजीनगरात ५२७, जालन्यात ३५४, बीडमध्ये १९९, धाराशिवमध्ये ७२ तर बुलडाण्यात ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिंधुदूर्ग, नंदूरबार, कोल्हापूर, हिंगोली, अकोला, वाशिम, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com