Water Scarcity : बुलडाणा जिल्ह्यात २९ गावांत धावताहेत टँकर

Water Shortage Update : यंदा मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. गावोगावी टँकरची मागणी होत असून एप्रिलमध्येच २९ गावांत टँकर धावत आहेत.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : अल्प पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. गेल्या काही महिन्यात या साठ्यात मोठी घट आली. यंदा मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. गावोगावी टँकरची मागणी होत असून एप्रिलमध्येच २९ गावांत टँकर धावत आहेत. पुढील महिन्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सध्या २९ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात १२ टँकर वाढवावे लागले. सध्या १ लाख १० हजार ४४५ लोकसंख्या केवळ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ४१ गावांतील नागरिकांना कुपनलिका व विंधन विहिरींचा आधार आहे.

Water Scarcity
Water Scarcity : मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई

बुलडाण्यातील ९ गावे, देऊळगावराजा ८, चिखली ७, मेहकरमधील २ आणि मोताळ्या ३ गावे दुष्काळी यादीत आहेत.

बुलडाणा तालुक्यात पिंपरखेड, वरवंड, ढासाळवाडी, डोंगरखंडाळा, सावळा, सुंदरखेड, हनवतखेड, चौथा, माळविहीर या गावांमध्ये टँकर धावत आहेत. देऊळगावराजात पिंपळगाव चिलमखा, कुंभारी, सुरा, वाकी बुद्रुक, देऊळगावराजा, दिग्रस बुद्रुक, वाकी खुर्द, सरंबा तर चिखलीत हातणी, कोलारा, सातगाव भुसारी, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड, सपकाळ, सैलानीनगर येथे टँकरने पुरवठा केला जात आहे.

मार्च महिन्याच्या मध्यापासून टँकरची संख्या वाढत चालली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या प्रारंभी १२ गावांना टँकरने पुरवठा करण्यात येत होता. मात्र, १५ मार्चपासून टँकरग्रस्त गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. १५ मार्च रोजी टँकरग्रस्त गावात चारने वाढ झाली. तर ३१ मार्चपर्यंत तब्बल १७ गावांना टँकरने पाणीपुरवठा होऊ लागला.

Water Scarcity
Water Crisis : नदीकाठावरील धामणगावात भीषण पाणीटंचाई

तर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात १२ टँकर वाढविण्यात आले. तर शेगाव तालुक्यातील जानोरी, बेलुरा, कुरखेड, चिंचखेड. सिंदखेराजा तालुक्यातील दत्तपूर, डावरगाव, जऊळका, किनगाव राजा, पांगरी उगले, उगला, सावरगाव माळ, आडगाव राजा, शेलू, धांदरवाडी, जांभोरा, केशव शिवणी, वाघरुळ, वाकद जहागीर, मलकापूर पांग्रा, जळगाव, निमगाव वायाळ, पिंपळखुटा,

निमखेड कसबा, सोनोशी, सोयदेव, तढेगाव, उमरद, वडाळी, वाघाळा, रुम्हणा, खामगाव तालुक्यातील खामगाव ग्रामीण, नांदुरा तालुक्यातील निमगाव, दादगाव, हिंगणा भोटा, हिंगणा दादगाव, बेलाड, खरकुंडी, पलसोडा, धाडी, हिंगणे गव्हाड, मोमिनाबादसाठी कूपनलिका व विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. ६५ विंधन विहिरींचाही आधार मिळतो आहे. ४१ गावांसाठी ७ कुपनलिका आणि ६५ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com