Contaminated Water  Agrowon
ॲग्रो विशेष

Contaminated Water : नाशिक जिल्ह्यात १४९ गावांतील पाण्याचे नमुने दूषित

Drinking Water : जिल्ह्याच्या १५ तालुक्यांमधील २७६७ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले असता यातील तब्बल १४९ जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळले. यात सर्वाधिक प्रमाण त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यांत आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असताना जलस्रोत दूषित होण्याचे प्रमाण वाढते आहे. जिल्ह्याच्या १५ तालुक्यांमधील २७६७ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले असता यातील तब्बल १४९ जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळले. यात सर्वाधिक प्रमाण त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यांत आहे. त्र्यंबकेश्‍वरमध्ये ५६ जलस्रोतांमध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळले.

आरोग्य विभागामार्फत जलस्रोतांची तपासणी करण्यात येते. या तपासणीअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाठवले जातात.

जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर दूषित नमुन्यांबाबत आरोग्य विभागाला अहवाल दिला जातो, दूषित जलस्रोतांचे आरोग्य विभागामार्फत शुद्धीकरण करून पुन्हा तपासणी केली जाते. पावसाच्या पाण्यामुळे दूषित पाणी नमुने गावांची संख्या वाढली आहे.

जुलै २०२४च्या अहवालानुसार १४९ गावांचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात मॉन्सूनचे जून महिन्यात आगमन झाले असले तरी, जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. तसेच जूनच्या तुलनेत जुलैमध्ये दूषित पाण्याचे नमुने वाढल्याचे विभागाकडून सांगितले जात आहे.

तालुकानिहाय पाणी नमुन्याची माहिती

तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने

कळवण १७५ ०

बागलाण ३१८ ४

मालेगाव २१७ ९

नांदगाव १२० २

चांदवड १४३ २

देवळा ९९ २

सुरगाणा २११ १०

पेठ २०४ ४

येवला २०० ०

निफाड १५३ ०

इगतपुरी ११७ १

नाशिक १०८ ११

दिंडोरी २८७ २१

सिन्नर १७२ २७

त्र्यंबकेश्‍वर २४३ ५६

एकूण २७६७ १४९

दूषित पाणी सुधारणा करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने त्यांना पत्र देऊन कळविले आहे. याशिवाय, संबंधित तालुका गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतींना नोटिसा काढल्या. दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याची दक्षता येण्याचे निर्देश दिले आहेत.
- दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT