Nagpur News : विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाचा सोयाबीन, कपाशीसह संत्रा बागांना देखील मोठा फटका बसला आहे. चांदूर बाजार तालुक्यात शुक्रवारी (ता. १५) पावसाने एकच हाहाकार उडाला. .शनिवारी (ता. १६) उमरखेड, महागाव, पुसद (यवतमाळ) भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मे त्यानंतर जून, जुलै महिन्यात काहीसा बरसलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात खंड दिला. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. .Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसामुळे हाहाकार.अशातच शुक्रवारी (ता. १५) अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यात एकाचवेळी ढगफुटीसदृश पाऊस बरसला. काही तासाच्या पावसाने या भागातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आला. माधान, देऊरवाडा, ब्राह्मणवाडा थडी, सोनोरी, खेल सखाराम देशमुख, नानोरी, सर्पापूर, कलोडी, कुऱ्हा, करजगाव शिरजगाव भाग-१,२,३ व काजळी यासह बहुतांश गावांतील पिके पाण्याखाली आली. .Heavy Rain Maharashtra : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ.यवतमाळ जिल्ह्यात देखील पावसाने हाहाकार उडाला आहे. महागाव, पुसद, उमरखेड हे तालुके सर्वाधिक प्रभावित ठरले आहेत. उमरखेडच्या विडूळ भागात ढगफुटीसदृष्य पाऊस बरसला. गेल्या २५ वर्षांत असा पाऊस बरसला नाही, अशी प्रतिक्रिया महेश्वर बिचेवार यांनी दिली. अनेक भागांतील नद्या, नाल्यांची पातळी अचानक वाढल्याने त्यांना पूर आला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याची माहिती सूत्रांनी दिली..असा बरसला पाऊस (मिमी)चांदूरबाजार ०.३बेलोरा १२.५करजगाव ५५.५आसेगाव ०.८तळेगाव मोहना ९.५शिरजगाव कसबा ३३.०३ब्राम्हणवाडा थडी ३९.८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.