Contaminated Water : दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Water Issue : राज्यातील उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, छोटी-मोठी धरणे, तलाव, विहिरींनी तळ गाठला आहे. घोटभर पाण्यासाठी वाड्यावस्त्या, दुर्गम भागातील नागरिकांना तळपत्या उन्हात पायपीट करण्याची वेळ आली आहे.
Contaminated Water
Contaminated WaterAgrowon

Pune News : राज्यातील उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, छोटी-मोठी धरणे, तलाव, विहिरींनी तळ गाठला आहे. घोटभर पाण्यासाठी वाड्यावस्त्या, दुर्गम भागातील नागरिकांना तळपत्या उन्हात पायपीट करण्याची वेळ आली आहे. मात्र गाळयुक्त आणि दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता विचारात घेऊन पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

Contaminated Water
Water Circulation : ‘गिरणे’चे आवर्तन आठ दिवसांत अखेरच्या भागात पोहोचणार

राज्यभरातील अनेक शहरांमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. उन्हाचा कडाका चांगलाच वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. खोल विहिरीत उतरून पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू आहे. मात्र अस्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले जात आहे. विहिरी आटल्यामुळे पाण्यासाठी बोअरवेल घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कित्येक किलोमीटर वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी काही नागरिकांनी थेट बोअरमधील किंवा टँकरमधून पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, काही बोअरमधील पाणी हे अशुद्ध असते तसेच या पाण्यात क्षार अधिक प्रमाणात असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे बोअरमधील पाणी पिताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

Contaminated Water
Water Pollution : जलप्रदूषणामुळे ‘रामसर’चे अस्तित्व धोक्यात

गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा फेब्रुवारीपासूनच राज्यभरात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ग्रामीण भागातील विहिरी, नद्या, ओढ्यांमध्ये खडखडाट झाला आहे. कित्येक किलोमीटरची पायपीट करून देखील नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही. तर शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला असल्याने पाणीपुरवठ्याचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक शहरी भागांत नळाला आठवड्यातून केवळ एकदा ते दोनदाच पाणी येत असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे अनेक जण हे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलमधील पाणी वापरत आहेत. तर, काहीजण टँकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

काय समस्या उद्‌भवू शकतात?

बोअरवेलमधील पाण्यात खनिज आणि क्षाराचे प्रमाण हे अधिक असल्यामुळे हे पाणी पचनासाठी जड असते. त्यामुळे अनेक वेळा पोटदुखी, किडनी स्टोन, पचनाच्या समस्या उद्‌भवू शकतात. तसेच काही वेळा हे पाणी शुद्ध नसल्याने केस गळती किवा त्वचा लाल पडणे, खाज सुटणे यांसारख्या त्वचेच्या समस्यादेखील उद्‌भवू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com