Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. किनवट तालुक्यातील सिंदगी मंडलांत २५५.५० मिलिमीटर पाऊस झाला. .या पावसामुळे जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी जिल्ह्यातील लहान-मोठ्या नदीनाल्यांना पुर आला आहे. नदीकाठची जमीन खरडून गेल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी (ता. १६) दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान अधिक झाले आहे. .Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार.या काळात जिल्ह्यात सरासरी ५६.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर २४ मंडलांत अतिवृष्टीने झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद किनवट तालुक्यातील सिंदगी मंडलात तब्बल २५५.५० मिमी झाली आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यातील सारसाम (१७३.७५ मिमी), हदगाव तालुक्यातील आष्टी (१५८.२५ मिमी), हिमायतनगर (१५९.५० मिमी), लिंबगाव (१३७.७५ मिमी), माहूर तालुक्यातील वानोळा (१४३.५० मिमी) आणि हदगाव तालुक्यातील तळणी (११४.२५ मिमी) या मंडलांतही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. .यासोबतच नांदेड शहर (७०.५०), नांदेड ग्रामीण (६६.२५), विष्णुपुरी (६६.२५), तरोडा (७३.५०), निवघा (१०४.२५), पिंपरखेड (१०८.२५), मातुळ (९२.२५), किनी (९२.२५), बोधडी (११५.२५), इस्लापूर (१२२.००), जलधराा (९३.७५), शिवणी (१२२.५०), मांडवा (८६.७५), मुदखेड (६७.००) हिमायतनगर (१५९.५०), सरसम (१७३.७५), वानोळा (१४३.५०), अर्धापूर (८३.७५), दाभड (६६.२५), मालेगाव (६८.००) या मंडलांत अतिवृष्टी झाली..Heavy Rain Maharashtra : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ.या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या, नाले व ओढ्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे..तालुकानिहाय झालेला पाऊस (पाऊस मिमीमध्ये)नांदेड ६८.६०, बिलोली २४.६०, मुखेड ४२.५०, कंधार ३०.१०, लोहा ३८.२०, हदगाव १२१.३०, भोकर ७५.४०, देगलूर १४.४०, किनवट १०३.९०, मुदखेड ६४.१०, हिमायतनगर ७४.६०, माहूर ३३.७०, धर्माबाद ६२.२०, उमरी ५१.८०, अर्धापूर ७२.७०, नायगाव (खे.) ३७.७०..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.