Kolhapur Agriculture Water agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Agriculture Water : कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमधील पाणी पातळी खालावली, शेतीचा पाणी प्रश्न गंभीर

Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा, वेदगंगा आणि पंचगंगा नद्यांची पात्रे कोरडी पडताना दिसत आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Drought Issue : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लघू आणि मध्यम प्रकल्पात दुष्काळाची स्थिती जाणवू लागली आहे. धरणातील पाणीसाठ्याच्या नियोजनामुळे पाटबंधारे विभागाकडून काटेकोर पालन केले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक नद्यांची पात्रे वारंवार कोरडी पडताना दिसत आहे. याचा थेट परिणाम शेती पिकांवर होत आहे. जिल्ह्यातील दुधगंगा, वेदगंगा आणि पंचगंगा नद्यांची पात्रे कोरडी पडताना दिसत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या धामणी खोऱ्यातील ९ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना समांतर शेतकऱ्यांनी स्वखर्चातून बांधलेल्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमालीची खालवली आहे.

राधानगरी व गगनबावडा तालुक्याच्या हद्दीवरील पखालीवाडी व कडवे दरम्यानच्या मातीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्याने धामणी नदी कोरडी पडली आहे. येथे शेतीचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांनी पाण्यासाठी नदीत जेसीबीद्वारे खड्डे मारले आहेत. उर्वरित बंधाऱ्यातील पाणी एप्रिलअखेर पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे धामणी परिसरात पाणीटंचाई तीव्र बनणार आहे.

धामणी नदीवरील राई कळकसांद्रे (ता. राधानगरी) येथील अनेक वर्षं रखडलेल्या मध्यम प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा या तीन तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून अद्यापही प्रकल्पाची कामे अपूर्ण आहेत. परिणामी शेतीच्या पाण्यासाठी समांतर बंधारे हाच एकमेव पर्याय असल्याने धामणी नदीवर राई (ता. राधानगरी) ते पणोरे (ता. पन्हाळा) पर्यंत नऊ ठिकाणी समांतर बंधारे बांधलेले आहेत.

यासाठी शेतकरी स्वखर्चाने व श्रमदानाने मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ते काटेकोर नियोजन करतो. अडीच लाख रुपये एका बंधाऱ्याला खर्च येत असून अडविलेले पाणी एप्रिलमध्येच संपून जाते. त्यामुळे एक महिना येथे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. सध्या म्हासुर्ली बंधाऱ्यात महिनाभर पाणी पुरेल इतके पाणीअसून गवशी बंधाऱ्यात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे.

पखालीवाडी व कडवेदरम्यानच्या मातीच्या बंधाऱ्यातील साठा पूर्णपणे संपला असून येथे धामणी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी शेतकरी नदीपात्रात जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी धडपडत करत आहेत. सध्या या परिसरात शेतीसह जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसतील अशी शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT