Hatkanangle Lok sabha : भारतीय जवान किसान पार्टीकडून रघुनाथ पाटील हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात

Bhartiy Jawan Kisan Party : देशातील माजी सैनिकांनी भारतीय जवान किसान पार्टी स्थापन केलेली आहे. हातकणंगलेत लोकसभा मतदार संघात मला उमेदवारी मिळाली आहे.
Hatkanangle Lok sabha
Hatkanangle Lok sabhaagrowon

Hatkanangle Lok sabha 2024 : लोकसभा निवडणुका होत असल्याने सर्वत्र बेबनाव सुरू आहे. हातकणंगले मतदारसंघात आघाडीत बिघाडी होत चालली आहे. एका बाजूला 'मोदी हटाव'चा नारा सुरू असताना महत्त्वाच्या मुद्द्यावर एकत्र न येता 'एनडीए'च्या आघाडीत केवळ किती जागा कोणाला मिळणार, या मुद्द्यावरून ही आघाडी फुटलेली आहे,"अशी टीका भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

पाटील म्हणाले, "मोदी हे उघड-उघड, तर शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर हे छुपे मनुवादी आहेत. काहीही झाले तरी मनुवादालाच मदत झाली पाहिजे, असे त्यांची भावना आहे. यातील कोणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलण्यास तयार नाही.

राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी जुळवून घेतले होते. मात्र ते आता 'एकला चलो' किंवा वेगळे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. मग हे मताचे विभाजन करून अप्रत्यक्ष मोदींनाच सहाय्य करत असल्याचे चित्र आहे."

देशातील माजी सैनिकांनी भारतीय जवान किसान पार्टी स्थापन केलेली आहे. देशभर या पक्षाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. हातकणंगलेत लोकसभा मतदार संघात मला उमेदवारी मिळाली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक ऊस आहे. उसाच्या प्रश्नाबाबत कोणीही बोलायला तयार नाही. कुणाला वेळही नाही. राजू शेट्टी हे दाखवतात की, मी कारखानदारांच्या विरोधात आहे, तर कारखानदार दाखवतात की, आम्ही राजू शेट्टी विरोधात आहोत.

Hatkanangle Lok sabha
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेत 'गोकुळ'ची भूमिका काय? अध्यक्ष अरूण डोंगळेंना मुख्यमंत्र्यांचा थेट फोन

मात्र प्रत्यक्षात या दोघांची गेली १५ वर्षे मिलीभगत आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील, धनपाल माळी, केतन जाधव, शंकर मोहिते, प्रणव पाटील, माणिक पाटील, अरुण पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी, कारखानदारांची मिलीभगत

१९६० पासून प्रत्येक दहा वर्षांनी उसाचा दर दुप्पट होत गेलेला आहे. २०१० ला हा दर २७०० रुपये झाला. त्यानंतर २०२४ ला तो दुप्पट होण्याऐवजी ३१०० रुपयांवर येऊन थांबला आहे. याला साखर कारखानदार व राजू शेट्टी यांची मिलीभगत सर्वस्वी जबाबदार आहे. २००९ ला राजू शेट्टी खासदार झाले, तेव्हापासून कारखानदाराशी हातमिळवणी केल्याने उसाची दरवाढ थांबली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com