CM Samrudha Mission : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या ९७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी नोटीस बजावली आहे. समाधानकारक खुलासा न दिल्यास नियमानुसार कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.