Akola News: अकोला जिल्ह्यात या वर्षात सततच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान केले असून त्याची झळ उत्पादनाला बसते आहे. यामुळे पैसेवारी घटून आता ५० च्या आत आली आहे. या वर्षी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सतत पाऊस झाला. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या स्थितीमुळे जिल्ह्याच्या नजरअंदाज नंतर आता सुधारित पैसेवारीत सुधारणा होत सरासरी ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे..सततच्या पावसामुळे यंदा सोयाबीन, कपाशी तसेच इतर पिकांचे नुकसान झाले. नुकसानाचे कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे संयुक्त अहवालावरून समोर आले..Kharif Season : खरिपातील साडेनऊ हजार क्विंटल बियाणे अहिल्यानगर जिल्ह्यात शिल्लक.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९२ कोटींचा मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये सुद्धा पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पाऊस झाला आहे. सोयाबीनचे पीक हातातून गेल्यानंतर आता कपाशीच्या पिकाचे सुद्धा नुकसान होत आहे..सवलती लागूशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना याआधीच आपत्तीग्रस्त घोषित केले आहे. या तालुक्यातील सर्व बाधितांना दुष्काळसदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सर्व सवलती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस एका वर्षासाठी स्थगिती, तिमाही वीज देयकात माफी, परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी जाहीर करण्यात आली आहे..Kharif Season 2025: महाराष्ट्रात खरीप पेरणीची गती वाढली; पावसाची चिंता मात्र कायम .ऑक्टोबरमधील सुधारित पैसेवारीचा शेतकऱ्यांना दिलासापैसेवारी ५० टक्क्यांच्या खाली निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांवर आल्यास परिस्थिती उत्तम असे पैसेवारीचे समीकरण मांडले जाते. जिल्ह्यात १०१२ महसुली गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांच्या लागवडी योग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील नजरअंदाज पैसेवारी सप्टेंबरमध्ये सरासरी ४८ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये सुधारित पैसेवारीसुद्धा सरासरी ४८ पैसे जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..सुधारित पैसेवारीतालुका गावे पैसेवारीअकोला १८१ ४९अकोट १८५ ४८तेल्हारा १०६ ४७बाळापूर १०३ ४७पातूर ९४ ४७मूर्तिजापूर १६४ ४७बार्शीटाकळी १५७ ४९एकूण ९९० ४८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.