Agriculture Irrgation Agrowon
ॲग्रो विशेष

Girna Dam : कानळदापर्यंत पोहोचले पाणी; ‘गिरणा’तील आवर्तन बंद

Water Crisis : चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून नुकतेच टंचाई निवारण्यासह उद्योगांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून नुकतेच टंचाई निवारण्यासह उद्योगांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कानळदापर्यंत (ता. जळगाव) पाणी पोहोचल्यानंतर आवर्तन बंद केले असून, या पाण्याचा लाभ नदीकाठच्या गावांना होत आहे.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. परंतु या धरणाचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास होतो. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल व धरणगाव या भागात गिरणाच्या पाटचाऱ्या आहेत. मागील वर्षी धरण फक्त ५६ टक्के भरल्याने त्यातून रब्बीसाठी आवर्तन देण्यात आले नाही.

फक्त पिण्यासाठी किंवा टंचाई दूर करण्यासाठी धरणातून पाणी दिले जात होते. यात दोन वेळेस उद्योगांसाठी पाणी दिले होते. टंचाई दूर करण्यासाठी नदीत तीन आवर्तने सोडण्यात आली. यंदा मात्र धरण १०० टक्के भरले आहे. यातून रब्बीसही पाणी दिले जात आहे. तसेच नदीत नुकतेच टंचाई दूर करण्यासाठी पाणी सोडण्यात आले.

धरणातून दोन हजार क्युसेक वेगाने हे पाणी सोडण्यात आले आहे. चाळीसगाव शहरासह भडगाव, पाचोरा येथील पिण्याच्या पाण्यासाठी या आवर्तनाचा लाभ होत आहे. तसेच नदीवरील दहिगाव, दापोरा येथील बंधाऱ्यातही पाणी आले. नदीकाठी सुमारे १४० गावांमधील शिवारासह पिण्याच्या पाण्यासंबंधीचे स्रोत यामुळे बळकट होतील किंवा त्यांना पाण्याचा स्रोत मिळेल, अशी माहिती मिळाली.

धरणातून पाणी सोडल्यानंतर सुमारे सहा ते सात दिवसांत ते कानळदापर्यंत पोहोचले. कानळदा गावानजीक नदीत पाणी पोहोचल्यानंतर आवर्तन बंद केले. कानळदा गावाच्या पुढे तापी नदीचे स्रोत उपलब्ध होतात. यामुळे फक्त कानळदापर्यंत हे पाणी दिले जाते.

परंतु कानळदापर्यंत पाणी पोहोचल्यानंतर किमान दोन दिवस पाणी नदीत प्रवाही असले पाहीजे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. गिरणा धरणातून नदीत पाच वेळेस आवर्तन सोडले जाते. तसे आदेश शासनाने पाटबंधारे विभागास दिले आहेत. यामुळे नदीत पाणी येऊन पुनर्भरण होते व शिवारातील कूपनलिका, विहिरींच्या स्रोतांना आधार होतो, असा दावा प्रशासनाने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT