Grain Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Grain Warehouse Scheme : धान्य गोदाम योजनेतील अंतिम अनुदानासाठी प्रतीक्षा

Agricultural Scheme : धान्य गोदाम योजनेअंतर्गत नाबार्डच्या माध्यमातून घेतलेले गोदाम बांधकाम डिसेंबर २०२१ ला पूर्ण झाले त्याचे एकूण १० लाख ४५ हजार अनुदानापैकी ४ लाख १९ हजार अनुदान वर्षभरापूर्वी मिळाले.

Team Agrowon

Jalna News : धान्य गोदाम योजनेअंतर्गत नाबार्डच्या माध्यमातून घेतलेले गोदाम बांधकाम डिसेंबर २०२१ ला पूर्ण झाले त्याचे एकूण १० लाख ४५ हजार अनुदानापैकी ४ लाख १९ हजार अनुदान वर्षभरापूर्वी मिळाले. मात्र अंतिम अनुदान प्राप्तीसाठी बँक आणि नाबार्डकडे पाठपुरावा करण्यापलीकडे एका महिला लाभार्थ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याची स्थिती आहे.

यासंदर्भात अधिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुकाअंतर्गत येत असलेल्या धावडा येथील सुनीता पंजाबराव देशमुख यांनी ग्रामीण धान्य गोदाम योजनेअंतर्ग गोदाम बांधण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबर २०२१ ला बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण बांधकामाची एका स्थानिक बँकेच्या अधिकाऱ्याकडून १८ एप्रिल २०२४ ला पाहणी करण्यात आली.

वर्षभरापूर्वी धान्य गोदाम योजनेअंतर्गत एकूण १० लाख ४५ हजार अपेक्षित अनुदानापैकी ४ लाख १९ हजार अनुदान मिळाले. परंतु अंतिम अनुदान अजूनही मिळाले नाही. आधी अनेकदा नाबार्ड व बँकेचा पाठपुरावा केला. अलीकडेच सप्टेंबर २०२४ मध्ये पुन्हा एकदा बँकेच्या धावडा शाखेकडे अंतिम अनुदान मिळावे यासाठी लिखित पाठपुरावा केला.

ग्रामीण भागात कृषी आधारित पायाभूत सुविधा उभारण्यामध्ये अंतिम अनुदान मिळण्यात विलंब होत आहे. कोरोना काळात पूर्ण केलेल्या प्रकल्पाचे अनुदान रखडलेला कालावधी लक्षात घेता उर्वरित अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी विनंती या पाठपुराव्यातून योजनेच्या लाभार्थी सुनीता देशमुख यांनी केली आहे.

१८ महिन्यांत किंवा फार तर २४ महिन्यांत बांधकाम पूर्ण झालेल्या गोदामाचे अनुदान मिळायला हवे होते. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, परंतु अंतिम अनुदान अद्याप मिळाले नाही. स्थानिक बँकेने आणि नाबार्डने याप्रकरणी लक्ष घालून तातडीने अंतिम अनुदान मिळेल अशी व्यवस्था करावी.
सुनीता पंजाबराव देशमुख, धावडा, ता. भोकरदन, जि. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT