Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आता वाढलेला हा टक्का कोणाच्या पथ्यावर पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष शनिवारी (ता. २३) लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे.
राजकीय चर्चेतून मराठवाड्यातील विधानसभेची निवडणूक अनेक मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची झाल्याची बोलले जाते. अर्थात, निवडणूक निकालानंतर निवडणूक कोणत्या मतदारसंघात नेमकी किती चुरशीची होती हे स्पष्ट होणार आहे. तीन जिल्ह्यात सुमारे ४३१ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८३ उमेदवारांसह बीडमधील १३९, तर जालन्यातील १०९ उमेदवारांचा समावेश होता.
तीन जिल्ह्यातील ७४४४ मतदान केंद्रांवरून बुधवारी (ता. २०) मतदानाची प्रक्रिया पार पडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदान झाले. तर जालना जिल्ह्यात ७२.२० टक्के व बीड जिल्ह्यात सरासरी ६७.७९ टक्के मतदान झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात तीनही जिल्ह्यात सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले. तर छत्रपती संभाजीनगर मध्य मतदार संघात सर्वात कमी ५९.३५ टक्के मतदान झाले.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये कन्नड मध्ये ६६.२ टक्के, फुलंब्रीत ७१.९९ टक्के, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये ६०.४० टक्के, छत्रपती संभाजीनगर पूर्व मध्ये ६०.६३ टक्के, पैठण मध्ये ७६.९५ टक्के, गंगापूर ७३.४५ टक्के तर वैजापूर मध्ये ७३.२१ टक्के मतदान झाले.
बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात ७२.६६ टक्के, माजलगाव मध्ये ६६.१० टक्के, बीडमध्ये ६१.५० टक्के, आष्टी ७१.४३ टक्के, केज मध्ये ६३.४८ टक्के तर परळीत ७२ टक्के मतदान झाले. जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघात ६९.४० टक्के, जालन्यामध्ये ६३.६३ टक्के, भोकरदन मध्ये ७७.२० टक्के, घनसावंगीत ७७.६ टक्के, बदनापूर मध्ये ७४.६० टक्के मतदान झाले.
आकडेमोड अंदाज सुरू
छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत गत काही निवडणुकीत सातत्याने निवडून येणाऱ्या काही महत्त्वपूर्ण आमदारांसह राज्याचे कृषिमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल आदी राजकारण्यांचे भवितव्य ईव्हीएम मशिन मध्ये बंद झाले आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता कोण निवडून येऊ शकतो, कोण पडणार, कोणाला कोणता मुद्दा बाधक, कुणाला कोणती बाब तारणार, कुणाला कोणत्या भागात किती मते पडू शकतात याविषयी आकडेमोड आणि अंदाज बांधणे सुरू झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.