Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Satara Assembly Election : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांसाठी चुरशीने ७१.९५ टक्के मतदान झाले आहे.
Satara Assembly Election
Satara Assembly ElectionAgrowon
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांसाठी चुरशीने ७१.९५ टक्के मतदान झाले आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढला असून मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पाच टक्के वाढले आहे. हा वाढलेला कोणाचा जय-पराजय करणार हे शनिवारी (ता.२३) मतमोजणी दिवशी समजणार असून उमदेवारांना धाकधूक लागून राहिली आहे.

सातारा जावळी विधानसभा मतदार संघात ६३.५३ टक्के मतदान झाले. महायुतीच्‍या वतीने भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तर महाविकास आघाडीच्‍या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम यांना उमेदवारी देण्‍यात आली होती. त्‍यांच्‍याव्‍यतिरिक्‍त अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील या निवडणुकीच्‍या रिंगणात होते.

Satara Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ७७.६४ टक्के मतदान अत्यंत उत्साहात पार पडले. भोसे येथे दोन गटांत झालेल्या किरकोळ मारामारीची घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.कोरेगाव मतदार संघात कोरेगाव तालुक्यासह सातारा व खटाव या दोन तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे.

मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे आमदार महेश शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे या प्रमुख दोन उमेदवारांसह १७ उमेदवार रिंगणात होते. माण विधानसभा मतदारसंघात एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी भाजपचे जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांच्यात जोरदार चुरस आहे.

कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचा परिणाम म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या वेळी मतदानात मोठी वाढ झाली. मतदारसंघातील माण व खटाव तालुक्यांत तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या ७१.९८ टक्के मतदान झाले. फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघात एकूण ७१.०६ टक्के मतदान झाले.

Satara Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

या वेळी मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजे समर्थक विद्यमान आमदार दीपक चव्हाण, तर खासदार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सचिन पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्वाभिमानी पक्षातर्फे प्रा. रमेश आढाव, तर रासपतर्फे दिगंबर आगवणे हे निवडणूक लढवत आहेत. मात्र, प्रामुख्याने आमदार दीपक चव्हाण व सचिन पाटील यांच्यातच थेट लढत होत आहे.

वाई विधानसभा मतदार संघात वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या ६७.५७ टक्के मतदान झाले. कार्यकर्त्यांमधील किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार मकरंद जाधव-पाटील आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यात अटीतटीची लढत आहे.

अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या बंडखोरीमुळे रंगत वाढली आहे. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. कऱ्हाड दक्षिणला ७६.३२ टक्के झाले. या मतदारसंघामध्ये आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कऱ्हाड दक्षिणमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर महायुतीकडून भाजपचे डॉ. अतुल भोसले या दोन प्रमुख लढतीसह अन्य उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ७४.७३ टक्के मतदान झाले. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कऱ्हाड उत्तरमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील, महायुतीकडून भाजपचे मनोज घोरपडे या दोन प्रमुख लढतीसह अन्य उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

पाटण विधानसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ७४.०४ टक्के मतदान झाले आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असून, कोणाला कौल देईल. याबाबत आता राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुतीकडून शंभूराज देसाई, तर महाविकास आघाडीच्‍या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हर्षद कदम व अपक्ष म्हणून सत्यजित पाटणकर अशी तिरंगी लढत होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com