Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Maharashtra Election 2024 : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) काही ठिकाणचे मशिनमधील तांत्रिक बिघाड आणि काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.
Maharashtra Election
Maharashtra Election Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) काही ठिकाणचे मशिनमधील तांत्रिक बिघाड आणि काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली.

दुपारी तीन वाजेपर्यंत ४३.४९ टक्के मतदान झाले. सोलापूर शहरात सोलापूरमध्ये आणि ग्रामीण भागात पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, करमाळा, सांगोला आणि माढा या मतदारसंघात अनेक केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. त्यात महिलांचा समावेश सर्वाधिक राहिला.

सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ३ हजार ७३८ मतदान केंद्रे असून, निवडणूक रिंगणात १८४ उमेदवार आहेत. सकाळी सातवाजता मतदानाला सुरवात झाली. सकाळापासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. विशेषतः महिलांच्या रांगा अनेक ठिकाणी दिसून आल्या. ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात सर्वाधिक मतदान झाले. त्यातुलनेत शहरात मात्र काहीशी संथगती होती.

Maharashtra Election
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

पण शहरात सोलापूर मध्य मतदारसंघात काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसले. त्याशिवाय ग्रामीण भागात पंढरपूर, बार्शी, माढा, करमाळा, अक्कलकोट आणि सांगोला मतदारसंघातील केंद्रांवर अशा रांगा तर लागल्या, पण सर्वाधिक चुरसही पाहायला मिळाली. दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास सर्वच मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी २५ ते ३० टक्क्यांवर पोचली होती.

या दरम्यान अक्कलकोट मतदारसंघात सर्वाधिक ३३.१८ टक्के तर पंढरपुरात सर्वात कमी २४.२६ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी तांत्रिक कारणाने मतदानास अडथळे आले, तर काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता मतदान सुरळीत पार पडले. सोलापुरात सोशल कॅालेजमधील बूथ क्रमांक ३२ येथे काही काळासाठी मशिनमध्ये बिघाड झाला, पण दुरुस्तीनंतर दोन तासानंतर तेथे मतदान पूर्ववत सुरू झाले.

बार्शी येथील मार्केट यार्ड येथील रहिवासी गणेश जाधव हे मतदान करायला गेल्यानंतर, त्यांच्या आधीच त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याठिकाणी काही काळ गोंधळ उडाला. पण नेमके काय झाले, याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर इथेही मतदान सुरळीत सुरु झाले. जिल्ह्यात सोलापूर दक्षिण, करमाळा आणि माढ्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवाराशिवाय अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली आहे.

Maharashtra Election
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीत पाच वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान

तर माळशिरस, बार्शी, अक्कलकोट, सोलापूर उत्तर, मोहोळ याठिकाणी थेट दुरंगी लढती होत आहेत. त्यामुळे चुरशीने मतदान होत आहे. सर्वच उमेदवारांनी आपल्या कुटुंबीयांसह एकत्र मतदान केंद्रावर जात मतदान केले. त्याशिवाय सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, अकलूजला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.

मतदारसंघनिहाय दुपारी तीन वाजताची आकडेवारी ः

करमाळा- ४२.४० टक्के, माढा- ४५.६७ टक्के, बार्शी-४७.५० टक्के, मोहोळ-४३.५१ टक्के, सोलापूर दक्षिण-४०.३७ टक्के, सोलापूर मध्य-३९.२१ टक्के, अक्कलकोट-४७.१५ टक्के, सोलापूर उत्तर -४१.०२ टक्के, पंढरपूर-३८.३० टक्के, सांगोला-४८.३६ टक्के, माळशिरस-४५.१४ टक्के (एकूण-४३.४९ टक्के)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com