Vasubaras Festival  Agrowon
ॲग्रो विशेष

Vasubaras Festival 2024 : पुणे कृषी महाविद्यालयात वसुबारस सण साजरा; देशी गायींच्या संवर्धनाचा संदेश

Pune Agricultural College : पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज सोमवारी (ता.२८ ) वसुबारस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Roshan Talape

Pune News : पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज सोमवारी (ता.२८ ) वसुबारस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी देशी गायींच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

बदलत्या हवामान स्थितीत देशी गायींमुळे पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे त्यांनी नमूद केले व शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि फायदेशीर उत्पादनाची संधी निर्माण करण्यावर भर दिला.

या प्रसंगी गुजरात मधील आनंद कृषी विद्यापीठाचे व कामधेनु विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एम. सी. वार्ष्णेय, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी कुलगुरू मा. डॉ. शंकरराव मगर व मा. डॉ. संजय सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे व डॉ. विलास भाले असे राज्याबाहेरील व महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे माजी कुलगुरू उपस्थित होते.

पुण्यातील फुलोत्पादन संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, तसेच कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संशोधन प्रमुख देखील या प्रसंगी उपस्थित होते. तसेच डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, फुलोत्पादन संशोधन संचालनालय, पुणे, डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, पुणे, डॉ. प्रमोद पाटील, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, पुणे, डॉ. सुनील मासळकर, माजी सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, पुणे, डॉ. धीरज कंखरे, तांत्रिक प्रमुख, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे व डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे हे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी गोठे, वातावरण नियंत्रित गोठा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प, गोबर गॅस संयंत्र आणि दुग्ध प्रक्रिया प्रयोगशाळा यांसारख्या देशी गाय संशोधन केंद्रातील आधुनिक सुविधा यांना भेट दिला. तसेच शाश्वत देशी गोपालनाच्या या मॉडेलबद्दल त्यांनी केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT