Indigenous Cow Conservation : देशी गाय संवर्धनासाठी गोशाळांना अनुदान

Cow Conservation Subsidy Scheme : राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Indigenous Cow Conservation
Indigenous Cow ConservationAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच देशी गायींचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना राज्यमाता -गोमाता दर्जा देण्याचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.

Indigenous Cow Conservation
Gir Cow Conservation : गीर गोवंश संवर्धन करणारी 'बन्सी गोशाळा'

२०१९ मधील २० व्या पशू गणनेनुसार देशी गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या १९व्या पशूगणनेशी तुलना करता २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे देशी गायींच्या संवर्धनासाठी गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन, प्रतिगाय ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाचा सामान्य शेतकऱ्याला कोणताही फायदा होणार नसल्याचेही स्पष्ट आहे.

Indigenous Cow Conservation
Desi Cow Conservation : निष्णात वैद्यकाचे वनशेती आणि देशी गोवंश संवर्धनाचे प्रयोग

गोशाळांचे उत्पन्न अत्यल्प असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांना बळकट करण्यासाठी अनुदान द्यावे, असा प्रस्ताव पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल.

गाय आता राज्यमाता- गोमाता

महाराष्ट्रात असलेल्या देवणी, लालकंधारी, खिलार, डांगी, गवळाऊ आदी देशी गायी आहेत. या गायींच्या संख्येत घट होत आहे. मात्र, वैदिक काळापासून त्यांचे असलेले स्थान, दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गाईचे शेण व गोमूत्राचे सेंद्रिय पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन यापुढे देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा शासन आदेश सोमवारी जारी करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com