Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : ‘वसाका’ विक्री प्रक्रिया होऊ देणार नाही

Vasantdada Patil Co-operative Sugar Factory : वसंतदादा सहकारी साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ न देण्याचा एकमुखी निर्णय वसाका बचाव समितीसह सर्वपक्षीय नेत्यांकडून घेण्यात आला.

Team Agrowon

Nashik News : कोणत्याही परिस्थितीत विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ न देण्याचा एकमुखी निर्णय वसाका बचाव समितीसह सर्वपक्षीय नेत्यांकडून घेण्यात आला. येथील ''वसाका'' कार्यस्थळावर बुधवारी (ता. २४) झालेल्या लाक्षणिक उपोषणप्रसंगी वसाका विक्री प्रक्रियेला स्थगिती मिळवत तो एकतर सहकार तत्त्वावर किंवा भाडेतत्त्वावर देत तो चालू व्हावा, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वेळी सभासद, कामगार व ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

राज्य सहकारी बँकेचे ‘वसाका’वर १०४ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने वसाका कारखान्याची विक्री निविदा काढली असून, त्याची अंतिम मुदत २६ जुलै आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदा असून यात सभासद, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने वसाका बचाव कृती समिती, ऊस उत्पादक संघर्ष समिती, वसाकाच्या माजी पदाधिकाऱ्यांचे वारसदार यांनी एकत्र येत बुधवारी (ता. २४) वसाका कार्यस्थळावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

याप्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर, ‘नाफेड’चे संचालक केदा आहेर, वसाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष पंडितराव निकम, निमंत्रक सुनील देवरे, योगेश आहेर, विलास देवरे, श्रीमती लक्ष्मीताई ग्याननदेव देवरे, सुनील आहेर, माजी संचालक यशवंत पाटील, प्रभाकर पाटील, कुबेर जाधव व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वसाका विक्री निविदा प्रक्रियेस तीव्र विरोध नोंदवला.

आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले, की वसाका विक्रीची निविदा कुठल्याही प्रकारे पूर्ण होऊ देणार नसून वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात यावी आणि समितीच्या माध्यमातून राज्य सहकारी बँक असो की शासन दरबारी जाणे असो यासाठी आपण सदैव समितीसमवेत आहोत. केदा आहेर यांनी सभासद व कामगारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करून खरेदी घेणाऱ्या व्यक्तीस वसाका कार्यस्थळावरून पळवून लावण्याची ठोस भूमिका मांडल्याने कामगार व ऊस उत्पादकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.s

या वेळी मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे संचालक विजय पगार, किसान युवा क्रांती संघटनेचे यशवंत गोसावी, ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, सुनील आहेर, माजी संचालक वसंत मोरे, केशव देवरे, जगदीश पवार, महेंद्र आहेर, शशिकांत निकम, यशवंत शिरसाट, विलास सोनवणे, रवींद्र सावकार, ‘स्वाभिमानी’चे राजू शिरसाठ, किरण मोरे, कैलास देवरे, संजय गायकवाड, मिलिंद शेवाळे, नानाजी मोरे, धर्मा देवरे, सुनील पवार,

राजेंद्र आहेर, फुला जाधव, प्रशांत शेवाळे, वसंत पाटील, धनंजय बोरसे, पी. डी. निकम, रामकृष्ण जाधव, चिंतामण आहेर, शांताराम पगार, सुभाष गायकवाड, राजेंद्र शिरसाट, भरत पाळेकर, पुंडलिक आहेर, दीपक निकम, अरुण सोनवणे, बाबूराव चव्हाण, दत्तू देवरे, विजय जगताप, संदीप पवार, भाऊसाहेब मोरे आदींसह सभासद, कामगार व शेतकऱ्यांनी उपोषणात सहभाग मोठ्या संख्येने नोंदवला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना याबाबतचे निवेदन देण्यात येऊन उपोषण मागे घेण्यात आले.

सहकार तत्त्वाचा पर्याय निवडावा

राज्य सहकारी बँकेचा वसाकावर व्याजासह ११० कोटी रुपये कर्जाचा बोजा आहे. कारखान्याची मालमत्ता चारशे कोटींच्या आसपास असताना राज्य सहकारी बँकेने १६२ कोटींची निविदा काढली आहे. त्यात कामगार देणी, व्यापारी देणी, ऊस उत्पादकांचे देणे याचा कुठलाही समावेश नसल्याने या निविदा प्रक्रियेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, वसाका कारखाना हा भाडेतत्त्वावर सुरू करण्यापेक्षा सहकार तत्त्वावर सुरू करावा आणि याकामी राज्य शासनाने केंद्र शासनाची मदत घेऊन निधी उभारावा, असे मत या वेळी अनेकांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT