Sugar Factory : ‘वसाका’ची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवा

Vasantdada Patil Co-operative Sugar Factory : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया त्वरित थांबविण्यात यावी व कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी अर्थात, मंत्रालय स्तरावर सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Nashik News : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया त्वरित थांबविण्यात यावी व कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी अर्थात, मंत्रालय स्तरावर सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी वसाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी बुधवारी (ता. १७) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

‘मविप्र’चे संचालक विजय पगार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे, अरुण सोनवणे, हिरामण बिरारी आदी उपस्थित होते. ‘वसाका’वर राज्य सहकारी बँकेचे व्याजासह १०४ कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. त्यामुळे या बँकेने १९ जून २०२४ ला ‘वसाका’ विक्रीची निविदा काढली असून, निविदेत १६२ कोटी ४४ लाख ७० हजार रुपये किंमत ठरविण्यात आली आहे.

Sugar Factory
Nashik Sugar Factory : ‘नासाका’ कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात ४० लाख वेतन अखेर वर्ग

त्यात कामगार देणी, शेतकरी, व्यापारी देणी, कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड व इतर अशी सर्व देणी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित खरेदीदाराने त्याच्या सोयीने देणे आहे. मात्र संबंधित कारखाना विक्रीचा प्रस्ताव ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगारांना अमान्य आहे. कारण ४०० कोटींची मालमत्ता अशा प्रकारे कमी दरात विक्री करून सभासदांची फसगत होता कामा नये.

उलट या कारखान्याची विक्री होऊ नये, यासाठी स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी बैठक बोलवावी. संबंधित विक्री प्रक्रिया बंद करून ‘वसाका’ पुन्हा भाडेतत्त्वावर देण्याबाबत फेरविचार केला जावा व योग्य पद्धतीने नवीन भाडेकराराची निविदा काढावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Sugar Factory
Sugar Factories : 'साखर कारखान्यांतील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे तपासणीत गैरव्यवहार'

पंडितराव निकम म्हणाले, की कुठल्याही परिस्थितीत ‘वसाका’ची विक्री होऊ देणार नाही, जर अशा प्रकारे विक्री होऊन कोणी खरेदी केली, तर त्यांना अशा प्रकारे कारखाना चालविण्यास प्रतिबंध करू. माझ्या या भूमिकेबाबत स्थानिक सभासदांनी आपली मते स्पष्ट करावीत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. विजय पगार यांनी सांगितले, की वसाका उभारणी कार्यात (कै.) ग्यानदेवदादा देवरे यांनी रक्ताचे पाणी करून कारखान्याची उभारणी केली. कसमादेचे हे वैभव टिकायला आणि चालायला हवे. त्याला विकणे हा पर्याय होऊ शकत नाही. विलास सोनवणे यांनीही ‘वसाका’ची विक्री होऊ नये, याचा पुनरुच्चार केला.

सभासदांनी कारखाना सहकार तत्त्वावर चालवावा

‘वसाका’ची विक्री होऊ न देता खरेतर तो सभासदांनी एकत्रित येत सहकार तत्त्वावर चालवला, तर अधिक उत्तम होईल. मात्र तसे न झाल्यास तो भाडेतत्त्वावर चालवला तरी चालेल. प्रमाणापेक्षा अधिक भाडेपट्ट्याची मागणी केली जात असल्याने त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने याबाबत सर्वंकष विचार होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com