Fishing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Fishing Season End : मॉन्सूनर्पूव पावसामुळे मच्‍छीमारांचे नुकसान

Fisheries Business : वादळी वाऱ्यामुळे समुद्रकिनारी भागातील वातावरण खराब झाल्याने मच्छीमारांनी नौका बंदरावरून थेट किनाऱ्यावर आणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Shriwardhan News : मॉन्सूनपूर्व पावसाचे मेमध्येच दमदार आगमन झाल्याने कोकणातील मासेमारी हंगाम संपुष्टात आला आहे. वादळी वाऱ्यामुळे समुद्रकिनारी भागातील वातावरण खराब झाल्याने मच्छीमारांनी नौका बंदरावरून थेट किनाऱ्यावर आणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हंगाम संपण्याआधीच मासेमारी बंद झाली आहे. यंदा रविवारपासून (१ जून) मासेमारी हंगाम बंद झाल्याने मच्छीमारांच्या रोजगारावर पावसाचे संकट उभे ठाकले आले.

श्रीवर्धन तालुक्यातील जीवना, भरडखोल, दिघी तसेच आदगाव बंदरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून नौका किनारी लावण्यात आल्या आहेत. मासेमारी पूर्ण बंद झाल्याने दररोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे.

भरडखोल बंदरात सध्या चारशेहून अधिक नौका किनाऱ्यावर उभ्या असून, मच्छीमारांनी हंगाम संपुष्टात आल्याचे मानून जाळीदेखील घरात नेण्यास सुरुवात केली आहे. अवेळी पावसामुळे सर्वांनीच मासेमारी थांबवल्याने जाळीदेखील वाळवण्यास जागा शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरवर्षी हंगामाची सांगता करत मच्छीमारांकडून जाळी स्वच्छ करून उन्हात वाळवण्याची तयारी सुरू केली जात होती; मात्र यंदा अवेळी पावसामुळे मे मध्येच मासेमारीची साधने घरात ठेवावी लागली. या आधीच वातावरणात मोठा बदल झाल्याने मासेमारीचा हंगाम कमी होऊ लागला आहे.

त्‍यातच अवेळी पावसामुळे मच्‍छीमारांच्या रोजगारावर संकट उभे राहिले आहे. शिवाय मेमध्ये मोठ्या प्रमाणात कोळी महिलांकडून मासे सुकविले जातात. यातून लाखो रुपयांचा आर्थिक लाभ होतो, मात्र यंदा मेमध्येच अवकाळीनंतर पाऊस सुरू झाल्याने कोळी महिलांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

१५ मेपासून पाऊस सुरू झाल्याने मासेमारी ठप्प झाली. भरडखोल येथे व्यवस्थित बंदर नसल्याने २९ मे रोजी गावातील एक बोट बुडाली. मासेमारीच्या शेवटच्या टप्प्यात सुक्या मासळीला मागणी असते, मात्र पावसाळामुळे भरडखोलमधील मासेविक्री करणाऱ्या सातशे महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी.
- दिनेश चोगले, माजी सरपंच, भरडखोल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT