Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी’चा हप्ता ९१.६५ लाख शेतकऱ्यांना वितरित
CM Devendra Fadnavis: नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ९) करण्यात आले. यामध्ये ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८९२.६१ कोटी रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत.