Fishing Business Alibaug : ‘मत्स्य व्यवसाय’ला हक्‍काचे कार्यालय

Fishing Business Office : इमारत पूर्ण होण्याची वाट न पाहता, जिल्हा कार्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि तालुका परवाना अधिकाऱ्यांची कार्यालये या इमारतीत कार्यान्वित करण्यात आली आहेत.
Fishing Business Alibaug
Fishing Business AlibaugAgrowon
Published on
Updated on

Alibaug : मत्स्यव्यवसाय विभागाच्या नव्या इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, इमारतीची किरकोळ कामे व सुशोभीकरण न झाल्याने उद्‌घाटन रखडले आहे. याआधी मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध विभागांसाठी दर महिन्याला ८० हजारांपेक्षा अधिक खर्च भाड्यासाठी करावा लागायचा. त्यामुळे इमारत पूर्ण होण्याची वाट न पाहता, जिल्हा कार्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि तालुका परवाना अधिकाऱ्यांची कार्यालये या इमारतीत कार्यान्वित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील ही प्रमुख कार्यालये १५ वर्षांपासून भाड्याच्या जागेत विखुरलेली होती. त्‍यामुळे मच्छीमारांना खूपच हेलपाटे मारावे लागत होते. आता एकाच संकुलात परवाना विभाग, वसुली विभाग, उपायुक्तांचे कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, मत्स्यसंग्रहालय असे विभाग आहेत. यासह एक मध्यवर्ती सभागृह असणार असून, मच्छीमारांचे कार्यक्रम घेता येणार आहेत.

एकाच छताखाली सर्व विभाग कार्यालये आल्‍याने इमारतीचे उद्‌घाटन भव्यदिव्य व्हावे, अशी मागणी जिल्ह्यातील मच्छीमारांची आहे. मत्स्यव्यवसाय विभागाला भाड्यापोटी आतापर्यंत एक कोटी रुपये भाड्यासाठी खर्च करावे लागले आहेत. हा खर्च थांबवण्यासाठी तीन विभाग कार्यालये इमारतीचे उद्‌घाटन न करताच सुरू करण्यात आली आहेत.

ब्रिटिशकालीन जुनी इमारत नादुरुस्त झाल्याने २०१७ मध्ये सर्व परवानग्या मिळविल्यानंतर, मत्‍स्‍यव्यवसाय संकुलासाठी दोन कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर झाला होता. या कामाचे कंत्राट विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या एजन्सीला मिळाले होते. त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे काम रखडले. त्यानंतर कंत्राटदाराची बिले रखडल्याने संकुलाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी सांगितले, मात्र लवकरच ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, किरकोळ कामे शिल्लक राहिलेली आहेत, मात्र तीदेखील करणे महत्त्वाची असल्याने संकुलाचे उद्‌घाटन करता येत नसल्याचे जगदीश सुखदवे यांचे म्हणणे आहे.

Fishing Business Alibaug
Alibag Rain : अलिबाग परिसरातील वादळात बोटी भरकटण्याचा धोका

प्रशासकीय खर्चात बचत

प्रशिक्षण केंद्राला ३४ हजार ६८३, तर मत्स्यव्यवसाय उपायुक्त कार्यालयाला २५ हजार ८०२ रुपये इतके भाड्यापोटी खर्च करावे लागत होते. हे पैसे आता वाचणार आहेत. त्याचबरोबर तालुका परवाना अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचेही ३० हजारांपर्यंत भाडे होते. ही बचत होणार असून, हा निधी मत्स्यवाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी खर्च केला जाणार आहे.

संकुलासाठी दोन कोटी ४६ लाखांचा खर्च

दुरवस्था झालेल्या इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले आहे. सर्व परवानग्या मिळवल्यानंतर २०१७च्या जानेवारीमध्‍ये कार्यारंभ आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आला आहे. संकुलासाठी दोन कोटी ४६ इतका खर्च येणार असून, याचे काम विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या एजन्सीने हे काम घेतले होते. इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, किरकोळ कामे शिल्लक असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे.

‘मत्स्यप्रबोधिनी’तून प्रात्‍यक्षिक

संकुलात मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा कारभार सुरू झाला आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षमतेच्या इंजिनची दुरुस्तीच्या प्रशिक्षणासह मासेमारीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाते. ‘मत्स्यप्रबोधिनी’ या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिद्धांतिक ज्ञान दिले जाते. ‘मत्स्यप्रबोधिनी’ नौकेचीही डागडुजी करण्यात आली आहे.

इमारतीच्या उद्‌घाटनाची वाट न पाहता, महत्त्वाची कार्यालये हलवण्यात आली आहेत. त्‍यामुळे भाड्यासाठी होणारा खर्च कमी होईल. मत्स्यव्यवसायाशी संबंधित असणारे विभाग येथे एकत्र येणार आहेत. प्रशासकीय कामाकाजाबरोबरच जिल्हाभरातून येणारे मच्छीमार बांधव, सोसायट्यांचे पदाधिकारी यांना हे सोयीचे जाणार आहे.

- संजय पाटील, मत्स्यव्यवसाय उपायुक्त-रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com