Pune News: पुणे जिल्ह्यात यंदा कापसाच्या लागवडीस भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. दर वर्षी सरासरी १,१२२ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. मात्र यंदा तब्बल १,९५५ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. सरासरीच्या ७४ टक्के इतकी भरघोस वाढ कृषी विभागाकडे नोंदवण्यात आली आहे..गेल्या काही वर्षात जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र कमी होते. परंतु मागील काही वर्षांपासून त्यात बदल होत आहे. यंदा खरीप हंगामात प्रामुख्याने दौंड, शिरूर, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये कापसाची लागवड झाली असून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कापसाला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे..Cotton Crop : कपाशीवर हवामानाची टांगती तलवार.या भागात क्षेत्र वाढीचे मुख्य कारण म्हणजे यंदाचे पोषक हवामान, सुरुवातीच्या पावसाचे समाधानकारक झालेले आगमन आणि कापसाला चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली. कापूस हे पीक तुलनेने कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने, काही भागात पाणीटंचाई असतानाही शेतकऱ्यांनी या पिकांची निवड केली आहे..जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, बियाण्यांची उपलब्धता आणि कीड नियंत्रणाबाबत मदत करण्यात येत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतभेटी देऊन पीक परिस्थितीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. लागवडीमध्ये झालेल्या वाढीनुसार यंदा कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील काळात हवामानातील चढ-उतार, कीड व रोगांपासून संरक्षण आणि बाजारातील दर यावर अंतिम उत्पादन व नफा अवलंबून असेल, असेही शेतकऱ्यांनी सांगितले..Cotton Sowing : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये २२ टक्के कपाशी क्षेत्र घटले .दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकरी नीलेश कोऱ्हाळे म्हणाले, की आमच्या भागात चोपण जमिनीचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी दहा एकर ऊस होता. पिकांची फेरपालट म्हणून यंदा कापसावर भर दिला. सुमारे दोन एकरांवर कापूस पिकांची लागवड केली असून तीन महिन्याचे पीक झाले आहे. हवामानही चांगले असून पिकांचे वाढ समाधानकारक आहे..तालुकानिहाय कापूस लागवड (हेक्टरमध्ये)तालुका सरासरी क्षेत्र लागवड क्षेत्र टक्केदौंड ३७० ७९० २१४बारामती ५५५ ५७३ १०३शिरूर १७८ ४९३ २७६इंदापूर १५ १४ ९५पुरंदर ० १७ ०जुन्नर ४ ६९ १६०एकूण ११२२ १९५५ १७४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.