ॲग्रो विशेष

Union Sports Ministry : क्रीडा मंत्रालयाचा कुस्तीचा डाव; भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यासह नवे अध्यक्ष संजय सिंग चितपट

President Sanjay Singh suspended : ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्ष पदाच्या पार पडलेल्या निवडणूक आणि अध्यक्ष पदावरून शनिवारी (२३ रोजी) नाराजी व्यक्त केली होती.

Aslam Abdul Shanedivan

New Delhi News : भारतीय कुस्ती संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांच्यावरून देशात पुन्हा एकदा कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिने आपण कुस्ती सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देखील पद्म पुरस्कार परत करत सरकारवर टीका केली होती. या टीकेनंतर देशातून संताप व्यक्त करण्यात येत होता.

दरम्यान भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने रविवारी मोठी कारवाई करत भारतीय कुस्ती संघच रद्द केला. तसेच नवनियुक्त कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंग यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे ही झालेली कारवाई भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का मानली जात आहे. याचबरोबर संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांवर स्थगिती दिली आहे.

नवनियुक्त कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंग यांनी त्यांच्या निवडिनंतर लगेच राष्ट्रीय नंदिनी नगर गोंडा येथे 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील गटांसाठी राष्ट्रीय स्पर्धा जाहीर केल्या होत्या. त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यावरून स्पष्टीकरण देताना भारतीय क्रीडा मंत्रालयाने, WFI च्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने केलेली ही घोषणा घाईघाईत केली आहे. यावेळी संघाने WFI च्या घटनेतील तरतुदी पाळलेल्या नाहीत.

या स्पर्धेबाबत कुस्तीपटूंना पुरेशी माहिती देखील दिलेली नाही अशे ताशोरे ओढलेले आहेत. तसेच नवनिर्वाचित अध्यक्षांनी घेतलेले निर्णय हे मनमानी आहेत असे देखील क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका २१ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह अनेक खेळाडूंनी या निर्णयावर आक्षेप घेतला.

तसेच साक्षी मलिकने टीका करत आपली निवृती घोषित केली. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पद्म पुरस्कार सरकारला परत करत ते फुथपाथवर ठेवले. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. तर खेळाडूंच्या विरोधानंतरच क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT