Delhi Wrestler Protest 2023: ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी करत संयुक्त किसान मोर्चा उतरला मैदानात; कुस्तीपटूंचं आंदोलन तापणार

Kisan Morcha : दिल्लीतील सुरू असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत संयुक्त किसान मोर्चा मैदानात उतरला.
Delhi Wrestler Protest 2023
Delhi Wrestler Protest 2023Agrowon
Published on
Updated on

Kisan Morcha Update : दिल्लीतील सुरू असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत संयुक्त किसान मोर्चा मैदानात उतरला. १ ते ५ जूनच्या दरम्यान देशभरात भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या पुतळ्याचं दहन करून राजीनामा व अटकेची मागणी संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात येत आहे.

१ जून रोजी हरियाणातील विविध भागात किसान मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. तसेच ५ जूनपर्यंत ब्रिजभूषण यांचा राजीनामा घेतला नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशाराही संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने देण्यात आला आहे.

त्यामुळे आता कुस्तीपटूंच्या आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच हरियाणातील सर्व जातीय खाप पंचायतीनं देखील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्याचे पडसाद काल (ता.१) रोजी हरियाणात उमटल्याचे पाहायला मिळाले.

कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते. ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी या कुस्तींपटूनी केली होती. परंतु या खेळाडूंच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही.

त्यामुळे संतप्त झालेल्या खेळाडूंनी नवीन संसद उद्घाटनाच्या दिवशी संसदेकडे मोर्चा वळवला. परंतु त्यावेळी या कुस्तीपटूंना पोलिसांकडून रोखण्यात आलं. त्यामुळे संतप्त खेळाडूंनी पदकांचं गंगेत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. परंतु शेतकऱ्यांनी नेत्यांनी खेळाडूंना विनंती करून पदक विसर्जनाचा निर्णय मागे घेऊन सरकारला पाच दिवसांचा इशारा दिला.

Delhi Wrestler Protest 2023
Delhi Government : दिल्ली सरकारची गरजच काय?

तसेच जोवर ब्रिजभूषण यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोवर इंडिया गेटवर आमरण उपोषण करण्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला संयुक्त किसान मोर्चा आणि विविध संघटना पाठींबा देत रस्त्यावर उतरल्या आहेत.

२९ मे रोजी संयुक्त किसान मोर्चाने ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला कुस्तीपटू बजरंग पुनिया यांची हजेरी होती. संयुक्त किसान मोर्चाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी पुनिया यांच्याकडून माहिती घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे.

देशभरात या आंदोलनाची तीव्रता पोचवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा जिल्हा आणि तालुका स्तरावर १ ते ५ जून दरम्यान आंदोलन करणार आहे. तसेच ५ जून रोजी ब्रिजभूषण यांचा सामूहिक पुतळा दहन करून राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच सर्वजातीय सर्वखाप महापंचायतनं कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. २ जून रोजी हरियानातील कुरुक्षेत्र येथील जाट धर्मशाळेत उत्तर भारतातील सर्व खाप महापंचायची बैठक आयोजित केली आहे. तसेच महिला खेळाडूंना न्याय देण्यासाठी रणनीती आखण्यात येणार असल्याचं सर्वजातीय सर्वखापच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुबे सिंह समैण यांनी स्पष्ट केलं.

हरियाणातील जज्जर जिल्ह्यात १ जून रोजी ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी करत अखिल भारतीय शेतकरी मजूर संघटनेनी सरकारचा निषेध केला. तसेच कुस्तीपटूंवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com