Dharashiva News: भूम तालुक्यातील एकूण ७४ ग्रामपंचायतींपैकी वांगी (खुर्द) व वारेवडगाव या दोन ग्रामपंचायती वगळता जवळपास ७२ ग्रामपंचायतींच्या मुदती पुढील काही दिवसांत संपत असून, या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे..मिनी मंत्रालय मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल काही दिवसांत वाजणार असून, त्यामुळे येणाऱ्या काळात मुदती संपत असलेल्या ७२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे. प्रशासक नेमणूक करताना पंचायत समिती कार्यालयामार्फत विस्तार अधिकारी, विविध आस्थापनांचे कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी सुपारवायझर या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते. .Local Body Elections: कोल्हापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सवतासुभा.यामध्ये एकूण ७२ ग्रामपंचायती विचारात घेता वरील सर्व अधिकारी संख्या २० च्या जवळपास असल्याने प्रत्येक अधिकाऱ्याला तीन ते चार ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून काम पाहावे लागणार आहे. यामुळे गावगाड्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींमधून गावाच्या होत असलेल्या विकासकामांची गती कमी होणार असल्याचे दिसून येत आहे. .त्यातच आजमितीला काही ग्रामसेवकांना एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार सांभाळावा लागत असून, पुढील काळात तीन ते चार ग्रामपंचायतींना एक प्रशासक नेमल्यास गावाच्या विकासकामांबाबत बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. मात्र, सध्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने मुदती संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे.Maharashtra Local Body Elections: राज्यातील २४ नगरपरिषदा, नगरपंचायती आणि १५४ सदस्यपदांसाठी निवडणूक, मतदानाला सुरुवात.पुरेसा वेळ नसल्याने या निवडणुका थेट एप्रिल, मे २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तयारीला लागलेल्या अनेक गाव पुढाऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही महिने मुदती संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केल्यास गावगाडा सुरळीत चालणार का? याबाबत गावखेड्यातील नागरिकांतून शंका व्यक्त केली जात असून, प्रशासन कशा पद्धतीने यावर तोडगा काढणार हे पुढील काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..या आहेत मुदती संपत असलेल्या ग्रामपंचायतीआंबी, आनंदवाडी, अंतरगाव अंतरवली, आरसोली, आष्टा, बागलवाडी, बऱ्हाणपूर, बेदरवाडी, बेलगाव, भोगलगाव, चांदवड, चिंचोली, चिंचपूर ढगे, चुंबळी, दांडेगाव, देवळाली, देवंग्रा, दिंडोरी, डोकेवाडी, दुधोडी, गणेगाव, घाटनांदूर, गिरवली, गोलेगाव, गोरमाळा, हाडोंग्री हिवरा, हिवर्डा, ईडा-पिडा, ईट, ईराचीवाडी, जांब, जयवंत नगर, जेजला, ज्योतिबाची ,वाडी, कानडी, लांजेश्वर, माळेवाडी, माणकेश्वर, मात्रेवाडी, नागेवाडी, नळीवडगाव, नान्नजवाडी, निपाणी, पखरूड, पाथरूड, पाटसांगवी, रामेश्वर, रामकुंड, साडेसांगवी, सोन्नेवाडी, सावरगाव दरे, सावरगाव पा., शेकापूर, सोनगिरी, सुकटा, तांबेवाडी, तिंत्रज, उमाचीवाडी, वडाचीवाडी, वाकवड, वाल्हा, वालवड, वांगी बुद्रुक, वांगी खुर्द, वंजारवाडी, वारेवडगाव, वरूड..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.