Brij Bhushan : ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र

Delhi Wrestler Protest 2023 : ‘पॉक्सो’प्रकरणी मात्र पोलिसांकडून क्लीनचिट
Delhi Wrestler Protest 2023
Delhi Wrestler Protest 2023Agrowon

New Delhi News : भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आज लैंगिक छळवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले.

दरम्यान ब्रिजभूषण यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली होती पण त्याला पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याने ती रद्द करण्यात यावी अशी शिफारस पोलिसांकडून न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

यामुळे या प्रकरणामध्ये ब्रिजभूषण यांना सरकारकडूनच क्लिनचिट मिळाल्याचे मानले जाते. तत्पूर्वी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने १५ जूनपर्यंत ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

दिल्ली पोलिसांनी पतियाळा हाउस न्यायालयामध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी ५५० पानांचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. अन्य सहा महिला कुस्तीपटूंनीही ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते त्याप्रकरणी राउज अॅव्हेन्यू न्यायालयामध्ये तब्बल एक हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. यात आरोपी म्हणून सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्या नावाचाही समावेश आहे.

Delhi Wrestler Protest 2023
Delhi Wrestler Protest 2023: ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी करत संयुक्त किसान मोर्चा उतरला मैदानात; कुस्तीपटूंचं आंदोलन तापणार

सात महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत लैंगिक शोषणप्रकरणी तक्रारी दाखल केल्या होत्या. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी दोन गुन्हे दाखल केले होते.

यात पहिला गुन्हा हा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर दाखल करण्यात आला होता तर दुसरा अल्पवयीन मुलीच्या तक्रारीला अनुसरून दाखल करण्यात आला होता.

अल्पवयीन मुलीने नोंदविलेल्या कथित तक्रारीबाबत दिल्ली पोलिसांनी कॅन्सलेशन रिपोर्ट सादर केला असून यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की आम्हाला संबंधित मुलीचे शोषण झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाही त्यामुळे आम्ही स्वतः हा खटला बंद करत आहोत.

पॉक्सोसंदर्भात दाखल तक्रारीवर बोलताना दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते सुमन नलवा म्हणाले की, संबंधित मुलीचे वडील आणि तिने स्वतः नोंदविलेल्या जबाबाच्या आधारावर आम्ही न्यायालयास हा खटला रद्द करण्याची विनंती केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com