Satara News: कुरवली बुद्रुक (ता. फलटण) पाणंद रस्त्यावरील वहिवाट मागील अनेक वर्षांपासून बंद होती. त्यामुळे दत्तनगर परिसरातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या माध्यमातून रस्ता खुला केल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले..कुरवली बुद्रुक (दत्तनगर) येथील बाळासाहेब कोंडिबा मिंड यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पाच वर्षांपासून त्यांची शेती पडून होती. दरम्यान, त्यांनी फलटण महसूल विभागाकडे रस्ता मिळावा, यासाठी पाठपुरावा केला..Panand Road: सटाणा तालुक्यात तीन पिढ्यांपासून बंद असलेला पाणंद रस्ता झाला खुला.त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आज तहसीलदार श्री. जाधव व महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पाणंद रस्ता खुला केला. .Panand Road: मेहकर, लोणारमधील ७९ शेत पाणंद रस्त्यांसाठी ११ कोटी खर्चास मंजुरी.शेतामध्ये विहिरीचे पाणी आणि इतर साधने असताना रस्त्याअभावी मिंड कुटुंबीयांची शेती पडून होती. आज रस्ता खुला झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले..हा पाणंद रस्ता शेतकऱ्याला खुला करून देण्यासाठी प्रांताधिकारी प्रियंकाआंबेकर, तहसीलदार डॉ. जाधव, बरड मंडळ अधिकारी दिलीप कोकरे, कुरवली तलाठी राहुल मोळक, पांडुरंग यादव ववाल्मीक बताने, पोलिस पाटील लकडे, पोलिस हवालदार अमोल चांगण यांनी विशेष मेहनत घेतली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.