Prataprao Jadhav Agrowon
ॲग्रो विशेष

Prataprao Jadhav : राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून संपूर्ण सहकार्य : केंद्रीय राज्यमंत्री जाधव

Union Minister of State Prataprao Jadhav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरूवात झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आयुष (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्रीची जबाबदारी देण्यात आली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील पाच जणांना संधी मिळाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आयुष (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्रीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईमधील अरोग्य भवन येथे बुधवारी (ता.१२) राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडून राज्याला संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.

यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार संजय रायमुलकर, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, आयुष विभागाचे संचालक प्रा. व्ही. डी रमण घुंगराळेकर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, राज्य कर्मचारी विमा योजनचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक डॉ नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आपण रूग्णसेवा करण्याचे ईश्वरीय कार्य करत आहोत. ही सेवा राज्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र या सेवेमध्ये आणखी सुधारणा करून बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाला संपूर्ण सहकार्य करेल असे जाधव यांनी म्हटले आहे. राज्यासह देशातील नागरिकांचा आयुर्वेदाकडे कल वाढत असून आयुर्वेदानुसार नवनवीन अभ्यासक्रम सुरू करून आयुर्वेद महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केले पाहिजे अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे.

तर देशात काही राज्यात स्वतंत्र आयुष विभाग असून राज्यानेही त्यासाठी प्रयत्न करावेत असेही जाधव म्हणाले. औषधी वनस्पतींची लागवडीसाठी ‘हर्बल गार्डन’ ही संकल्पना राबविण्यात यावी. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. तर कच्चा मालाच्या विक्रीची हमी देखील शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा सूचना जाधव यांनी केल्या आहेत.

पावसाळ्यात साथीचे रोग फैलावणार नाही. यासाठी पाणी नमुण्यांचे अहवाल तपासण्यात यावेत. प्रतिबंधात्मक उपाय योजना आखात नाविण्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब करवा. आयुष विभागाच्या माध्यमातून असंसर्गजन्य आजारांवर विविध उपचार पद्धतींचे संशोधन करावे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या बाबी, अडचणी व उणीवांचा समावेश असणारा आराखडा बनवून द्यावा, अशाही सूचना जाधव यांनी केल्या.

निधीत वाढ करा : आरोग्य मंत्री डॉ. सावंत

यावेळी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासन ‘पीआयपी’ (कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा) अंतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ करण्याची मागणी केली. तसेच आरोग्य विभागातंर्गत काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासह नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्राचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी दिल्ली येथे राज्यातील आरोग्य यंत्रणेसोबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशीही मागणी सावंत यांनी जाधव यांच्याकडे केली.

दरम्यान बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी आपआपल्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा कारभार गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यात थंडीची चाहूल

Paddy Crop Damage: पावसाचा भात पिकाला फटका

Animal Blood Bank: पशुधन, पाळीव प्राण्यांसाठीही रक्तपेढी

Grape Farmers: अर्ली द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांना यंदाही ‘तडा’

Bhavantar Yojana: सोयाबीन उत्पादकांसाठी राज्यातही भावांतर योजना राबवा 

SCROLL FOR NEXT